Sitaphales from remote areas for sale. In the second picture, the rush to buy sitafal.
Sitaphales from remote areas for sale. In the second picture, the rush to buy sitafal. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : आदिवासी भागात बारमाही उत्पन्नाच्या स्रोताची आस; ठोस पावले उचलण्याची आवश्यकता

सम्राट महाजन

Nandurbar News : सातपुड्याचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सीताफळांचा हंगाम आता संपण्याचा मार्गावर असून, सीताफळ विक्रीतून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना एक ते दीड महिन्यासाठी का होईना पण रोजगार उपलब्ध झाला आहे.

मात्र सीताफळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान या भागात आले तर त्यातून स्थानिक आदिवासी बांधवांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध होत, त्यांना बाराही महिने उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. (sale of custard apple has provided employment to tribals in remote areas nandurbar news)

त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे बोलले जात आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये हजारो सीताफळांची झाडे असून, दर वर्षी सीताफळाचा हंगाम असलेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये दुर्गम भागातील आदिवासी बांधव सीताफळ विक्रीसाठी तळोद्यात मोठ्या संख्येने येतात.

दरम्यान, सातपुड्यातील नागरिक रासायनिक खतांचा वापर न करता सीताफळांच्या झाडांचे संगोपन करतात व सीताफळदेखील नैसर्गिकरीत्या पिकवितात. त्यामुळे सीताफळे चवीला स्वादिष्ट, अधिक गोड लागतात. या वर्षीदेखील सातपुड्याच्या रानमेवा तळोद्याच्या बाजारपेठेत दाखल झाला असून, सीताफळांच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.

आदिवासी बांधव सीताफळे टोपलीमध्ये घेऊन येत असून, पूर्ण टोपलीनुसार त्यांची विक्री करीत आहेत. मोठ्या टोपलीला पाचशे रुपये, तर लहान टोपलीतील सीताफळांना दोनशे ते तीनशे रुपयांना ग्राहक खरेदी करीत आहेत. यानुसार साधारणतः एका किलोचा दर ३५ ते ४० रुपये पडत आहे.

नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरातमधील व्यावसायिकदेखील मोठ्या प्रमाणावर सीताफळांची खरेदी करीत आहेत. येथून खरेदी केलेली सीताफळे दुसऱ्या ठिकाणी जादा दराने विक्री करीत असल्याचे समजते. सीताफळ नाशवंत फळ असल्यामुळे ते जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही.

त्यामुळे सीताफळावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून विकले तर स्थानिक ग्रामस्थांना अधिक प्रमाणात व बाराही महिने पैसे कमविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

मंत्री डॉ. गावितांकडून अपेक्षा

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यांच्या मागच्या व आताचा मंत्रिपदाच्या कार्यकाळात आदिवासी बांधवांसाठी अनेक योजना राबवीत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता सीताफळावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान या भागात आणून, सातपुड्यातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या भागातील नागरिक बाळगून आहेत.

प्रक्रिया केल्यास तयार होणारे पदार्थ

जॅम, आइस्क्रीम, पेये, श्रीखंड, मिल्कशेक, रबडी.

प्रश्न अनुत्तरितच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोलगी दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी येथील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील धडगाव दौऱ्याच्या वेळी या भागातील नागरिकांना आर्थिक पाठबळ प्राप्त होण्यासाठी सीताफळ उद्योगाला चालना देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र अद्यापही या भागातील नागरिकांचा हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT