nandgaon
nandgaon 
उत्तर महाराष्ट्र

समीर भुजबळांच्या नांदगाव दौऱ्याचे फलित कुठले ? राजकीय वर्तुळात चर्चा 

सकाळवृत्तसेवा

नांदगाव - डॅमेजकंट्रोल साधण्यासाठी आलेल्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या दौऱ्यात बहुतांशी नेते पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळलेली उपस्थिती हा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. 

पंकज भुजबळ यांच्या विजयाच्या तिसऱ्या हॅट्ट्रिकसाठी होणाऱ्या प्रयत्नांचा भाग म्हणून अलीकडेच माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व लोकसभेच्या संभाव्य उमेदवार असलेल्या भारती पवार यांच्या समवेत नुकताच नांदगाव मनमाड भागाचा दौरा केला. भुजबळांनी येवल्याची बारामती केली म्हणून येवल्यापेक्षा काकणभर अधिकचे सवाई नांदगाव करण्याचे त्यांनी दाखविलेले स्वप्न काही प्रमाणात उतरू लागले असतानाच राज्यात सत्तांतर झाले अन सगळे गणित बिघडले. छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर अरिष्ट कोसळले. हा सर्व काळ आव्हानांचा होता अडचणींचा होता हे मान्य केले. तरी अशा संकट काळात कसोटी होती पंकज भुजबळ यांच्यातील नेतृत्व कौशल्याची, त्यांना ती दाखविण्याची संधी होती. हेवीवेट नेतृत्वाचा वारसदार म्हणून पंकज भुजबळ यांना आपल्या अस्तित्वाची व नेतृत्व गुणांची चुणूक दाखविण्याची संधी होती. अर्थात अशा संकटकाळात त्यांचे हे नेतृत्व तावून सुलाखून निघाले असते. मिळालेला वेळ व मोकळीक पंकज भुजबळ यांनी गमावली किंवा घालविली त्यामुळे संपर्क वाढण्याऐवजी आहे तो असलेला संपर्क कमी झाला. याउलट स्वीय सहाय्यकांच्या भरवशावर सगळा कारभार चालला त्याच्यातही अधिकृत कोण यालाच महत्व आले. मोजक्या ठेकेदारांच्या कळपाला मिळालेली राजकीय प्रतिष्ठा व त्यांचे होणारे पुर्नवसन यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी वाट्याला आली. या सर्वांचा परिणाम राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या तालुक्याच्या सगळ्या व सर्व प्रकारच्या सत्ता गमावण्याची त्यातून वेळ आली.  

पक्ष पातळीवर अथवा नेतृत्व पातळीवर पाठराखण करणारी निष्ठावान मंडळी हळूहळू आउट ऑफ कव्हरेज झाली अशा सर्व पातळीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व त्याबाबतची रणनीती आखण्यासाठी आलेल्या समीर भुजबळ यांचा दौरा सूचक व बोलका असला तरी असे डॅमेज कंट्रोल कसे साधले जाते यावर पुढील सर्व वाटचाल विसंबून आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT