onion auction satana.jpg
onion auction satana.jpg 
उत्तर महाराष्ट्र

रास्ता रोकोनंतर आज होणार कांद्याचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : कांद्याला सर्वत्र चढे भाव मिळत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजता कांद्याचे लिलाव अचानक बंद पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील सटाणा-मालेगाव रस्त्यावर बाजार समिती प्रशासनाचा निषेध करीत तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लिलावासाठी आलेल्या सर्व कांद्यांचा लिलाव आज  (ता.२५) केला जाईल, असे आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिल्याने उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. 

कांदा लिलाव ठप्प झाल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक
आज आण्णासाहेब पाटील यांची जयंती असल्याने बाजार समितीमधील सर्व हमाल-मापार्‍यांना मुंबई येथे होणार्‍या कार्यक्रमासाठी जयचे असल्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हमाल-मापार्‍यांनी काम आवरते घेतले. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांना लिलाव करणे अशक्य झाल्याने सर्व लिलाव देखील ठप्प झाले. काही कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात लिलावासाठी कांद्याची वाहने आणली होती. मात्र  हमाल-मापार्‍यांमुळे लिलाव बंद पडले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवार (ता.२६) पासून लिलाव पूर्ववत सुरू होतील असे जाहीर करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले.

रास्ता रोकोनंतर आज होणार कांद्याचा लिलाव

येत्या चार दिवसात पावसामध्ये कांदा भिजला तर भाव कमी मिळेल या भीतीने कांदा उत्पादकांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. बाजार समिती आवारात अखेर २५० वाहनांमधील कांदा लिलाव होणे बाकी आहेत. हे सर्व लिलाव आज बुधवार (ता.२५) सुरू होतील असे आश्वासन बाजार समिती प्रशासनाने व हमाल मापार्‍यांनी दिल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT