Vijayakumar gavit Sakal
उत्तर महाराष्ट्र

Ashram Schools : आश्रमशाळांना दोन वर्षांत स्वमालकीची इमारत - डॉ. विजयकुमार गावित

डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन; वसतिगृहांचाही समावेश करणार

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : राज्यातील सर्व आश्रमशाळा तसेच वसतिगृहांना येत्या दोन वर्षांत स्वमालकीच्या इमारती असतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. जिल्ह्यातील भालेर, वाघाळे येथील शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृह/ आश्रमशाळांच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. गावित म्हणाले, की नजीकच्या काळात शासनाने आदिवासी विकास विभागाला बऱ्याच ठिकाणी नवीन आश्रमशाळा व वसतिगृहांच्या इमारती बांधण्यास निधी दिला आहे. राज्यात जिथे आश्रमशाळा व वसतिगृहाच्या नवीन इमारती नाहीत, अशा ठिकाणी दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा मिळाव्यात, चांगल्या पदावर नोकरी मिळावी हा त्याच्यामागील हेतू आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात यावर्षी ५६ नवीन इमारती बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक आश्रमशाळा, वसतिगृहाचा समावेश आहे.

या सर्व इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होऊन पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की आश्रमशाळेतील विद्यार्थी हे इतर समाजातील विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी राज्यात करिअर अकादमी काढण्याचे नियोजन असून येथे नियमित शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचे शिक्षण देण्यात येईल.

विद्यार्थी मागे पडू नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी आदिवासी विकास विभागातून आवश्यक ती निधीची तरतूद करण्यात येईल. आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य वेळेवर खरेदी करण्यासाठी पूर्वीच्याच पद्धतीचा अवलंबून करण्यात येणार आहे.

आश्रमशाळेत वॉशिंग मशिन

गावित म्हणाले, की यंदापासून प्रत्येक आश्रमशाळेत वॉशिंग मशिन देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील भार कमी होईल. दोन वर्षांत आश्रमशाळेच्या ठिकाणी शिक्षक, कर्मचारी यांचे निवासस्थान बांधण्याचे नियोजन आहे, जेणेकरून आश्रमशाळा ही संकल्पना यशस्वीपणे पार पाडता येईल. प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल हा १०० टक्के लागावा, यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत एकाच पद्धतीने अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन-तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्याही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT