Sesame crop even in summer in Kapadne  Dhule News
Sesame crop even in summer in Kapadne Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule | कापडणे शिवारात उन्हाळ्यातही बहरली तीळ

जगन्नाथ पाटील

कापडणे (जि. धुळे) : धुळे तालुक्यातील शेतकरी शेतीतून आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी विविध प्रयोग करू लागले आहेत. स्निग्ध वर्गीय तीळ (Oily sesame seeds) हे खास पावसाळी पीक आहे. तीळ उन्हाळ्यात घेण्याचा प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. मात्र बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांची तिळीची उबवण झाली नाही.

मात्र येथील युवा शेतकरी राजा पाटील यांनी ठिबक सिंचनने घेतलेली तीळ शंभर टक्के उबवली आणि आता चांगलीच बहरली आहे. उन्हाळ्यात बहरलेली तीळ बघण्यासाठी बरेचसे शेतकरी येत आहेत. नुकतीच कृषी मंडळ अधिकारी मनीषा पाटील, कृषी सहाय्यक संजय देवरे व कृषी पर्यवेक्षक सतीष कोतकर, भगवान पाटील, कैलास पाटील, दीपक काटे, विजय पाटील आदींनी भेट दिली. त्यांनी तिळीच्या बहरलेल्या पिकाबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकरी राजा पाटील यांनी घेतलेल्या काळजीविषयी माहिती जाणून घेतली. तसेच मार्गदर्शनही केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT