Settlement of three and half thousand payment in district treasury esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्हा कोशागारात साडेतीन हजार देयकांचा निपटारा; 3 सेकंदांच्या विलंबामुळे 1 कोटीचा निधी परत!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा कोशागार कार्यालयाने मार्चमध्ये वेगवेगळ्या विभागांच्या विविध ४८६ कोटी ११ लाखांच्या तीन हजार ७२१ देयकांचा निपटारा केला. ३१ मार्चअखेर या कार्यालयाकडे ५६५ कोटी १४ लाखांची देयके सादर झाली. (Settlement of three and half thousand payment in district treasury dhule news)

जिल्हा कोशागार कार्यालयाकडे जिल्हा परिषदेतील विविध विभागांसह आरोग्य, कृषी, शिक्षण विभागातील आणि इतरही कार्यालयांमधील कामांची देयके सादर केली गेली. यात प्रामुख्याने पगार बिले, प्रवासभत्ता, कार्यालयीन खर्चाची बिले, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक देयके, कार्यालयीन खर्च, वीजबिल, दूरध्वनी बिल, निवृत्ती वेतन यासह विविध कामांच्या देयकांचा समावेश होता.

यावर्षीही मार्च महिन्यात विविध विभागांकडून तीन हजार ७२१ देयके जिल्हा कोशागार कार्यालयाकडे ३१ मार्चअखेर सादर झाली. ही सर्व देयके ५६५ कोटी १३ लाख ८० हजार ६६ रुपयांची होती. पैकी कोशागार कार्यालयाने ४८६ कोटी ११ लाख २७ हजार ९२६ रुपयांच्या देयकांचा निपटारा केला आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

३१ मार्चला तब्बल ५५० देयके कोशागार कार्यालयात सादर झाली. जिल्हा कोशागार अधिकारी प्रवीण पंडित, अपर कोशागार अधिकारी प्रवीण देवरे, उपकोशागार अधिकारी पंकज देवरे, लेखापरीक्षक भागवत पाटील, पंकज राजपूत, विवेक सावंत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी देयकांचा निपटारा केला.

विलंबामुळे निधीचा परतावा

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा निधी मार्चअखेर खर्च करावा लागतो. यामुळे ३१ मार्चला रात्री बारापर्यंत राज्यस्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यांना वितरित झाला. बीडीएस प्रणालीवर निधी आल्याचे दिसतात तो खर्ची टाकण्यात येतो.

जिल्हा परिषदेला एक कोटीचा निधी शासनाने ३१ मार्चला रात्री बाराला वितरित केला. निधी वितरणाच्या पत्रावर रात्री बाराला स्वाक्षरी झाली. हा निधी बीडीएस टाकण्यासाठी केवळ तीन सेकंदांचा विलंब झाल्याने निधी शासनाला परत गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT