A truck overturned near a bus stand on Thursday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : प्रकाशा बसस्थानकाजवळ ट्रक उलटून 7 जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : येथील बसस्थानकाजवळ भरधाव ट्रक उलटून सात जण गंभीर झाले, उभी रिक्षा, तीन दुकानांचे नुकसान झाले. गुरुवारी (ता. ५) सकाळी सव्वानऊला हा अपघात घडला.

राजकोटहून छत्तीसगडकडे जाणाऱ्या ट्रक (जीजे ०३, बीव्ही ३९९४)ने पुढे चालणाऱ्या मोटारसायकलीला वाचविताना ब्रेक मारला असता चालकाचा ताबा सुटला. (Seven people are critical after a truck overturned near Prakasha bus stand nandurbar news)

त्यामुळे ट्रक विरुद्ध दिशेला उलटला. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या प्रकाशा बसस्थानकाजवळ गुरुवारी हा अपघात झाला.

त्यात बसच्या प्रतीक्षेत बसस्थानकाजवळ थांबलेले प्रवासी शिवदास द्वारका पावरा (वय ५०), कांतीबाई शिवदास पावरा (४५), बेबी गुरखा पावरा (३०), अश्विनी गुरका पावरा (४), पल्लवी शिवदास पावरा (३, सर्व रा. रावलापाणी, ता. तळोदा) हे गंभीर जखमी झाले.

चालक रितेश राम अवतार पांडे, क्लीनर महादू अभयसिंग माखाजी (रा. अहमदाबाद) हेही जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा (एमएच २३, ८८६६) दबली गेली. तसेच तीन दुकाने दबली गेली.

ट्रकमध्ये प्लॅस्टिकच्या कच्च्या मालाच्या गोण्या, सबमर्सिबल मोटार, ज्यूसर मशिन, जिरे गोण्या, धनाडाळ आदी साहित्य विखुरले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास वळविण्यात आली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT