उत्तर महाराष्ट्र

शाळाबाह्य,स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम

shcool marathi news search out school children launched

नेरः कोविड 19 या जागतिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र व राज्यशासन बालकांच्या नियमित शिक्षणासाठी आणि बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
 

रोजगाराची अनिश्चितता,सामाजिक असुरक्षितता,पालकांच्या मनातील भीती यामुळे वाढणारे बालमजुरी,बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचे आव्हान येथील शासकीय अधिकारी, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस इतर शासकीय विभागातील कर्मचारी या समित्यांचे नियोजन करून ही जबाबदारी सोपविण्यात येत आहे.यासाठी 23 फेब्रुवारीच्या शाळा बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण शासन निर्णयानुसार 1 ते 10 मार्च पर्यंत व्यापक स्वरूपात ही शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

शोधमोहीम कोणाची व कोठे करावी

प्रत्येक गावात शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळ घर, गावाबाहेरील पालं,वीटभट्या,दगडखाणी,मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे,झोपड्या, फुले व अन्य वस्तू विकणारी,रस्त्यावर भिक मागणारी बालके,अस्थाई निवारा करणारी कुटुंबे अशा विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर ऊसतोड कामगारांच्या वस्त्या शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालके, मागास व वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती या शोध मोहिमेतून घेण्यात येणार आहे.

शोध मोहिमेची कार्यपद्धत

शोध मोहीम ही वस्ती,वाडी, गाव,वार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून गाव,केंद्र,बीट विभाग व शाळा स्तरानुसार नियोजन तयार करून घेण्यात येणार आहे. 
ही सर्व जबाबदारी निश्चित केल्यानंतर आदेशित केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करून या प्रशिक्षणामध्ये शोध मोहिमेचा मुख्य हेतू याबाबत मार्गदर्शन होणार आहे. 
येथील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.येथील विद्यार्थ्यांची शोधमोहीम घेतांना नेर बिटाच्या केंद्रप्रमुख श्रीमती निर्मला कदम येथील न्यू इंग्लिश स्कुल नेर शाळेचे मुख्याध्यापक श्री नवल पाटील,जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक विजय निकुंभे,शिक्षिका संगीता देवरे,शिक्षक पृथ्वीराज बोडरे,अंगणवाडी मदतनीस जयश्री माळी,शिक्षकेत्तर कर्मचारी सुरज खलाणे आदी. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT