बस स्थानकावर शिरपूर-सूरत बसमध्ये गांजा ताब्यात घेऊन जाताना पोलिस अधिकारी esakal
उत्तर महाराष्ट्र

चक्क बसच्या सीटखाली आढळून आला गांजा

विनायक सूर्यवंशी

नवापूर (जि. नंदुरबार) : शिरपूर-सूरत बस मध्ये नंदुरबार नवापूर दरम्यान गांजाची बॅग सीटखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ८० हजाराचा आठ किलो सुका गांजा आढळून आला. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता.३) दुपारी दोनच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती बसचालक-वाहकाने नवापूर आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना दिली. नवापूर आगार प्रमुखांनी सदर घटनेची माहिती नवापूर पोलिसांना दिली.

शिरपूर-सूरत बस नवापूर बस स्थानकावर आल्यावर वाहकाने सदर बॅग वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा केली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. बस मधील मिळालेला आठ किलो सुका गांजा ताब्यात घेतला, त्याची अंदाजित किंमत ८० हजार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांनी दिली. नवापूर पोलिस पुढील तपास करत आहे. दरम्यान, बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT