उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या जय्यत तयारीमुळे भाजपची होणार जळगावात कोंडी

कैलास शिंदे

जळगाव - लोकसभेचा जळगाव मतदारसंघ ‘युती’च्या समझोत्यात भाजपकडे आहे. सद्यःस्थितीत या ठिकाणी भाजपचाच खासदार आहे. भाजपने उमेदवारीबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसताना मित्रपक्ष शिवसेनेने मात्र पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करीत प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीआधीच चुरस निर्माण झाली असून, भाजपसमोरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.

भाजप व शिवसेनेतर्फे युतीच्या माध्यमातून आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढविल्या गेल्या. एका पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता जळगावात युतीचाच विजय होत असून, भाजपचा खासदार निवडून येत आहे. मित्रपक्ष शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रामाणिकपणे साथ दिली आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत यश मिळाले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेने या मतदारसंघात आपल्या उमेदवारासाठी तयारी केली आहे. पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. तात्या यांची उमेदवारी शिवसेनेने निश्‍चित केली असून, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. युती झाली तरीही शिवसेनाच या मतदारसंघात लढेल, असे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी जाहीर केले आहे. अर्थात शिवसेना कोणत्याही परिस्थितीत जळगाव मतदारसंघाची निवडणूक लढणारच आहे. निवडणुकीत युती झालीच, तर हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याची मागणी करू आणि युती न झाल्यास आम्ही स्वबळावर लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील आहेत. पक्षाने उमेदवारीबाबत कोणाचेही नाव जाहीर केलेले नाही. खासदार पाटील याच मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले आहेत. तिसऱ्यांदाही ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपणही इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षातच पेच निर्माण झालेला असताना आता शिवसेनेनेही लढण्याची तयारी केल्याने उमेदवारीचा तिढा निर्माण झालेला आहे. 

अवघडलेला भाजप
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आर. ओ. (तात्या) पाटील यांनी मतदारसंघात भेटीगाठीची एक फेरी पूर्ण केली. त्यामुळे ते रणांगणात राहणार, हे निश्‍चित आहे. आता या हक्काच्या मतदारसंघात भाजपसमोर शिवसेनेने उमेदवारीचा डाव टाकल्याने युती झाली आणि नाही झाली, तरीही अवघडलेल्या भाजपला या मतदारसंघात कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT