Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Homestead Bill News : घरपट्टीच्या नावाने धुळेकरांची लूट थांबवा : शिवसेना (उबाठा)

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील सुमारे १३ ते २० हजार नागरिकांना महापालिकेकडून सुमारे तीन ते पाचपट वाढीव घरपट्टीची बिले देण्यात आली आहेत.

ही करवाढ जाचक तर आहेच पण ती कायदेशीरदेखील नाही, निराधार आहे.

नियम-कायद्याची पायमल्ली करणारी आहे असे म्हणत दहा दिवसांच्या आत ही बिले मागे घ्यावीत अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे. (Shiv Sena Ubatha say Stop the robbery of Dhule People name of Home tax Agitation if bills not withdrawn within ten days Dhule news)

घरपट्टीबाबत कायद्याचा व अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. निष्ठुर व असंवेदनशील मनपातील सत्ताधारी भाजप पदाधिकारी व नगरसेवक यांना जनतेच्या या समस्येशी काहीही देणेघेणे नाही ही बाब भाजप सत्ताधाऱ्यांच्या जाचक व्यवहारावरून स्पष्ट होत असल्याचे श्री. माळी यांनी म्हटले आहे.

प्रक्रियेचा अवलंब नाही

करवाढ करताना महासभेची मंजुरी घेण्यात आली नाही, नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत, आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्यात आलेला नाही.

दहा ते वीस वर्षांपासून असलेल्या घर व इमारतीस सुमारे २० टक्के, २० ते ३० वर्षांदरम्यान असलेली घरे-इमारतीस ३० टक्के, ३० ते ४० वर्षांची घरे व इमारतींना ४० टक्के, तर ५० वर्षांपुढील इमारतींना सुमारे ५० टक्के कर सवलत देणे जरुरीचे असताना या सर्व बाबींचा करवाढ करताना विचार झालेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डाटा दोषपूर्ण

एका खाजगी संस्थेकडून महापालिका हद्दीतील घरे व इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून दोषपूर्ण व चुकीचा डाटा उपलब्ध करण्यात आला आहे. त्या सर्व सर्वेक्षणातील माहितीवर नागरिकांचा आक्षेप आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कायदेशीर बाबींचा तसेच वस्तुस्थितीचा योग्य तो विचार करावा. जाचक घरपट्टी दहा दिवसांच्या आत मागे घेण्यात यावी अन्यथा शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. माळी यांनी दिला आहे.

श्री. माळी यांच्यासह पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, भरत मोरे, नितीन शिरसाठ, देवीदास लोणारी, दिनेश पाटील, रफिक पठाण, विनोद जगताप, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, मनोज जाधव, सिद्धार्थ करनकाळ, मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर आदींनी मागणीचे निवेदन मनपा प्रशासनाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT