उत्तर महाराष्ट्र

शिवसेना "या" जागेसाठी आग्रही

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचा आमदार सद्यःस्थितीत आहे. मात्र, यापूर्वी या मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार होता. त्यामुळे या जागेसाठी शिवसेना आग्रही राहील. या ठिकाणी पक्षाचे सुरेशदादा जैन हेच उमेदवार असतील, असे मत शिवसेनेचे जळगाव लोकसभा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे सुरेश भोळे आमदार आहेत. त्यांनी गेल्यावेळी शिवसेनेचे सुरेशदादा जैन यांचा पराभव केला होता. भाजपचे आमदार असल्यामुळे ही जागा युतीत भाजपच लढविणार असल्याची घोषणा भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र, शिवसेनेतर्फे या जागेची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जळगाव लोकसभा क्षेत्राचे पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, की जळगाव विधानसभेच्या जागेबाबत शिवसेना आग्रहीच राहणार आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. कारण, या जागेवर शिवसेनेचे आमदार होते. त्यामुळे या जागेवर आमचा हक्क राहणार आहे. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील.

सुरेशदादा जैन उमेदवार 
युतीच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे ही जागा लढविण्यात येईल, असे मत व्यक्त करून श्री. सावंत म्हणाले, की माजी आमदार सुरेशदादा जैन यांचे आजही जळगाव शहरात वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे तेच पक्षाचे उमेदवार असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT