shubham gupta  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : भारत संकल्प यात्रेचे काटेकोर नियोजन करा : शुभम गुप्ता

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्रीय फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोचावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात २२ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत पाच सुसज्ज व्हॅनव्दारे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली.(Shubham Gupta statement of Plan India Sankalp Yatra Strictly dhule news)

विकसित भारत संकल्प यात्रानिमित्त सातपुडा सभागृहात सीईओ गुप्ता यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र शेळके, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. गुप्ता म्हणाले, की, नियोजित यात्रेमार्फत ग्राम स्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा उद्देशाने यात्रेव्दारे देशव्यापी मोहिम केंद्राकडून राबविण्यात येणार आहे.

ही मोहीम यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावे. यात्रेसाठी शासनाकडून पाच सुसज्ज व्हॅन जिल्ह्यात येणार असून त्यांच्यामार्फत चारही तालुक्यात, तसेच एक व्हॅन नगरपालिका, महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार करेल.

समन्वय समिती

यात्रा शहरे व गावपातळीपर्यंत जाणार असल्याने दररोज काटेकोर नियोजन करावे. एकही गाव सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्राच्या सुचनेनुसार मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याची व्यवस्था, स्थळ आदींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी.

त्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर दहा ते बारा सदस्यांचा समावेश असेल, अशी समन्वय समिती स्थापन करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.

लाभार्थ्यांचे अर्ज

यात्रेदरम्यान शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घ्यावेत. या यात्रेचे प्रत्येक गावात, पाड्यात, आठवडे बाजार, जत्रा, बाजारपेठेच्या ठिकाणी आयोजन करावे. प्रत्येक गावात पथनाट्याचे आयोजन करावे.

तसेच त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभेचे नियोजन करावे. यात्रेची माहिती, फोटो, व्हिडीओ अपलोड करावे. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थ्यांचा जनसहभाग घेऊन ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात यावी, अशी सूचनाही सीईओ गुप्ता यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT