Satote-Murder-Case
Satote-Murder-Case 
उत्तर महाराष्ट्र

सहा पोलिस अधिकारी चौकशीच्या चक्रात

सकाळवृत्तसेवा

नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ५) हा ऐतिहासिक निकाल देताना या खटल्यात निर्दोषांना अडकविणाऱ्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक के. एस. भारते, सहाय्यक निरीक्षक शफुद्दीन सय्यद, शरद गव्हाणे, नारायण शिंदे यांच्यासह सहा पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. के. एस. भारते यांच्यासह इतर पाच जण निवृत्त झाले आहेत. 

बेलतगव्हाण येथील विष्णू हगवणे यांच्या पेरूच्या बागेत ५ जून २००३ मधील हत्याकांड बरेच गाजले. त्र्यंबक एकनाथ साटोटे हे पत्नी विमलबाई, मुले संदीप, श्रीकांत व मनोज, मुलगी सविता यांच्यासह मजुरीचे काम करून पेरूच्या बागेचा सांभाळ करत. बागेतील झोपडीत दरोडेखोरांनी त्यांच्या मुलीला लगतच्या बागेत नेत बलात्कार करून तिचा खून केला. पत्नीवरही बलात्कार केला. त्यांना विरोध करणाऱ्या साटोटे यांच्या संदीप व श्रीकांत या दोन मुलांचे खून केले. ‘गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी’ परभणी व जालना भागात अशाच स्वरूपाचा महिलांवर बलात्कार करून खून केल्याचे गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांनी संशयावरून भोकरदन येथील अंकुश मारुती शिंदे, राजा आप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंदे, राजू म्हसू शिंदे, बापू आप्पा शिंदे, सुऱ्या ऊर्फ सुरेश गंगाराम शिंदे यांना अटक केली. नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एस. भारते प्रथम तपासाधिकारी होते.

एकाच घरातील तीन मुलांचे खून, पत्नी व मुलीवर अत्याचाराच्या अतिशय निर्दयी घटनेचे तीव्र पडसाद उमटून काही तासांत पोलिसांविरोधात आक्रोश उभा राहिला. एकाच वेळी संवेदनशील गुन्ह्याचा तपास आणि कायदा व सुव्यवस्थेचा विषय हाताळताना पोलिसांना नाशिक जिल्हा रुग्णालयाऐवजी सिन्नरला मृतदेह नेण्यापासून बराच खटाटोप करावा लागला. मंगळवारी (ता. ५) साटोटे हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मागे घेत खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाने आनंद झाल्याचे आरोपी राजा शिंदेची पत्नी राणी शिंदे यांनी सांगितले. कर्ता मुलगा तुरुंगात शिक्षा भोगत असताना राजाची आई चंद्रकला शिंदे यांनी दहा वर्षे न्यायालयीन लढाई केली. आठ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर राणी शिंदे न्यायालयीन लढाई लढत आहेत.

समांतर तपास यंत्रणा
पोलिस ठाण्याच्या समांतर पद्धतीने तत्कालीन गुन्हेशोध विभागाचे सहाय्यक आयुक्त भास्कर धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला. निरीक्षक शफुद्दीन सय्यद यांनी गुन्हा नोंदवला. निरीक्षक शरद गव्हाणे यांनी जबाब घेतले. निरीक्षक रमेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे, श्‍वानपथकाचे प्रमुख चिमलिंग ओंकार आदींनी तपास केला. यात १२ जून २००६ ला नाशिकच्या सत्र न्यायालयाने सहा आरोपींना फाशी सुनावली.

संशयिताने त्याविरोधात उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले. नऊ वर्षांपूर्वी याच न्यायालयाने संशयितांना फाशी सुनावली होती. यापूर्वी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात शिक्षा कायम राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी दाखल केलेली फेरविचार याचिकाही त्यांच्याविरोधात गेली होती. त्यानंतर आरोपींना दिलासा मिळाला आहे.

कर्ती माणसं तुरुंगात असल्याने सासू चंद्रकलाबाई, मी, माझ्या नणंदा अशा महिलांना मजुरी करून हा न्यायालयीन संघर्ष करावा लागला. त्यात आठ वर्षांपूर्वी सासूबाई गेल्या. तीन वर्षांपूर्वी नणंद, अकुंशचे वडील मारोती शिंदे मरण पावले. माझ्या चिमुरड्या मुलीचे भविष्य उजाड झाले. असे खूप काही गमावले. निकालानंतर न्याय मिळाल्याचा आनंद आहे. पण खूप काही गमावल्याचे दुःख जास्त आहे.
- राणी शिंदे, भोकरदन, निर्दोष सोडलेल्या आरोपीची पत्नी

पाच खून व बलात्काराचा मोठा गुन्हा होता. अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहिलेला नाही. त्यामुळे निकालावर काही बोलणे उचित होणार नाही.
- ॲड. अजय मिसर, सरकारी वकील

एकाचे निधन, बाकी निवृत्त
गुन्हेशोध विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे दीड महिन्यापूर्वीच निधन झाले. पोलिस ठाण्याचे प्रमुख व वरिष्ठ निरीक्षक के. एस. भारते यांच्यासह उर्वरित पाचही अधिकारी निवृत्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT