A police team checking the controversial drug stockpile in the Railway Station Road area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : रिक्षासह लाखाची गुंगीची औषधे जप्त

सुरत (गुजरात) येथून शहरातील स्टेशन रोड भागात गुंगीची औषधे विक्रीसाठी आलेल्या एका तरुणासह दोन संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने गजाआड केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : सुरत (गुजरात) येथून शहरातील स्टेशन रोड भागात गुंगीची औषधे विक्रीसाठी आलेल्या एका तरुणासह दोन संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने गजाआड केले.

रिक्षासह एक लाखाचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त केला. (sleeping pills worth lakhs seized along with rickshaw dhule crime news)

सुरत (गुजरात) येथून एकजण गुंगीकारक औषधांच्या बाटल्या घेऊन एकास विक्रीसाठी शहरातील स्टेशन रोड परिसरात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रये शिंदे यांना मिळाली.

याअनुषंगाने स्टेशन रोड परिसरात शोधकार्य सुरू झाले. रेल्वे स्टेशनसमोर रस्त्याच्या बाजूला एक संशयित पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या बाळगताना दिसला.

यादरम्यान त्याच्याजवळ रिक्षा आली.

पथकाने दोघांना पकडले. मोहम्मद अहमद शाह (रा. मिठीखाडी लिंबायत, सुरत, गुजरात) व शोएब खान अजीज शाह पिंजारी (रा. गजानन कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) अशी त्यांनी नावे सांगितली.

त्यांच्याकडून ५३ हजार ५५० रुपयांच्या ३५७ गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि ६० हजारांची रिक्षा (एमएच १८, एजे ६०२७) जप्त केली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, प्रकाश पाटील, श्याम निकम.

संजय पाटील, संदीप पाटील, सुरेश भालेराव, रवींद्र माळी, संतोष हिरे, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, नीलेश पोद्दार, सुशील शेंडे, सागर शिर्के, हर्शल चौधरी, कैलास महाजन यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : नागपुरात गो-तस्करी करणाऱ्या वाहन चालकाला भररस्त्यात केलं विवस्त्र, पोलीस स्टेशनपर्यंत काढली धिंड

Malgaon Crime : मालेगाव हादरले! डोंगराळे येथे सव्वाचारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्दयीपणे खून; नराधमाला फाशी द्या, ५ तास रास्ता रोको

IND vs SA: शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर? पहिल्या सामन्याआधी संघातून बाहेर केलेल्या अष्टपैलूला टीम इंडियाने पुन्हा बोलावलं

Latest Marathi Breaking News : मालेगाव ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या प्रकरण, संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखला

उषा नाडकर्णीं यांनी सांगितला स्वामींच्या प्रचितीचा अनुभव, म्हणाल्या...'हिंदुजा हॉस्पिटलच्या वाटेवर...'

SCROLL FOR NEXT