social initiative by Deore family of Mhasdi to Update beds for patients dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वडिलांच्या स्मरणार्थ रुग्णांना अद्ययावत बेड; म्हसदीच्या देवरे कुटुंबीयांचा सामाजिक उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शैक्षणिक संस्थेत कारकुनी करत स्वतःची मुले शिक्षक व्हावीत म्हणून झटणाऱ्या वडिलांच्या मृत्यूपूर्वीच्या संकल्पनेनुसार शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असलेले मोठे बंधू, शिक्षकपुत्र, कन्या, जावई, पुतणे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी गावात लवकरच होणाऱ्या शिवस्मारकासाठी अकरा हजार रुपये देणगी, गावातील गरीब, गरजूंसाठी ग्रामपंचायतीस रुग्ण बेड व अंत्यसंस्काराचे स्वयंपूर्तीने काम करणारे रुग्णसेवकास हाताचे किमती घड्याळ भेट देत अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवारी (ता. २३) होणाऱ्या पंचक्रिया विधीच्या पूर्वसंध्येला येथील देवरे कुटुंबातील सदस्यांनी हा उपक्रम राबविला. (social initiative by Deore family of Mhasdi to Update beds for patients dhule news)

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे तत्कालीन संचालक तथा शिवाजी शैक्षणिक संस्थेचे ज्येष्ठ निवृत्त लिपिक, म्हसदी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष भास्करराव माधवराव देवरे यांचे गेल्या सोमवारी अल्प आजाराने निधन झाले.

गावासाठी विधायक उपक्रमात नेहमी सहभागी असणाऱ्या देवरे कुटुंबातील सदस्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला. (स्व.) भास्करराव देवरे यांचे वडील (स्व.) माधवराव चिंधूजी देवरे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना शासनाचा आदिवासीसेवक पुरस्कारही मिळाला होता.

भास्करराव देवरे यांचे मोठे बंधू रमेश माधवराव देवरे सध्या श्री छत्रपती शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष असून, मुलगा राज भास्करराव देवरे वसमार (ता. साक्री) येथील माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषय शिक्षक आहे. सून, मुलगी, जावई व मोठा पुतण्याही शिक्षक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‌आजोबांचा वारसा प्रेरणादायी

शिक्षक राज देवरे यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव देवरे सलग पंधरा वर्षे सरपंच होते. गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे म्हणून गावातील शेकडो युवक लोकवर्गणी उभी करत आहेत. त्यांना मदतीचा हात म्हणून देवरे कुटुंबाने शिवस्मारकासाठी अकरा हजार रुपये देणगी दिली आहे.

तसेच गावातील रुग्णांना अद्ययावत बेड (बिछाना) ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. गावात अंत्यसंस्कारासाठी स्वयंपूर्तीने काम करणारे रुग्णसेवक रामराव झिपरू ह्याळीस यांना भास्करराव देवरे यांची खास आवड असलेले मनगटी घड्याळ भेट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT