scholarship
scholarship  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्याला 62 लाख 70 हजारांची शिष्यवृत्ती; समाजकल्याण विभागाला प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे ६२ लाख ७० हजार रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे. याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरच शिष्यवृत्तीची रक्कम आरटीजीएसद्वारे वर्ग केली जाईल, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी मनीष पवार यांनी दिली.

समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी, व्हीजेएनटी, सफाई कामगारांची मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून शिष्यवृत्ती देण्याचे शासन धोरण आहे. (Social welfare department received scholarship of 62 lakh 70 thousand to dhule district news)

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, ओबीसी संवर्गातील विद्यार्थिनी तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमुक्तांचा मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

विविध शिष्यवृत्ती

सफाई उद्योगात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना अडीच हजार रुपये, अनुसूचित जातीमधील नववी व दहावीतील मुला-मुलींसाठी ज्या पालकांचे उत्पन्न वार्षिक दोन लाखांच्या मर्यादित असेल त्यांना अडीच हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये व नववी ते दहावीसाठी दीड हजार केंद्र सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दरमहा एक हजार.

तसेच पाचवी ते सातवी उत्तीर्ण अनुसूचित जातीसाठी पाचशे व इतरांना दोनशे व आठवी ते नववी उत्तीर्ण अनुसूचित जातीकरिता एक हजार व इतरांना चारशे रुपये शिष्यवृत्ती मिळते.

असा मिळतो लाभ

शिवाय, दहावी परीक्षा शुल्क परत योजनामधून विद्यार्थ्यांना ३८५ रुपये वर्षासाठी मिळतात. मात्र, एकापेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या एका विद्यार्थ्याला शालान्तपूर्व शिष्यवृत्तीपैकी कोणत्याही एका शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो.

शिष्यवृत्तीनिहाय प्राप्त निधी (रुपयांत) असा : सफाई उद्योगातील पालकांच्या पाल्यांना दोन लाख, ओबीसी विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (आठवी ते दहावी) दहा लाख ५० हजार, ओबीसी विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (पाचवी ते सातवी) आठ लाख, विजाभज व विमाप्र विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (पाचवी ते सातवी) सहा लाख.

विजाभज व विमाप्र सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (आठवी ते दहावी) दहा लाख, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना विद्यावेतन ४० हजार, अनुसूचित जाती विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (पाचवी ते सातवी) सहा लाख, अनुसूचित जाती विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (आठवी ते दहावी) आठ लाख.

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (माध्यमिक) दोन लाख ४० हजार, अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क किंवा परीक्षा शुल्क दोन लाख ४० हजार, विजाभज व विमाप्र गुणवत्ता शिष्यवृत्ती (माध्यमिक) चार लाख, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क किंवा परीक्षा शुल्क तीन लाख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT