उत्तर महाराष्ट्र

चीन सोबतच्या युद्धात ते लढले आणि जखमी झाले; अखेर सैनिक दिनाला ते अनंतात विलीन

जगन्नाथ पाटील

निमगुळ/कापडणे : निमगुळ ता.शिंदखेडा येथील निवृृृत्त सैनिक भास्करराव मल्हारराव बागल (वय 83) यांचे आज (ता.15) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी पाचला अंत्यसंस्कार करण्यात आले. बागल हे सैन्य दलातील मराठा बटालियनमध्ये असतांना त्यांनी चीन, पाकिस्तान, बांगलादेश मुक्ती युध्दात सहभाग त्यांचा होता. 

भास्करराव बागल हे मराठा बटालियनमध्ये असतांना  इनफ्रन्र्टीमध्ये होते. 1962 च्या चीन व 65 च्या पाक युध्दात ते लढले होते. चीन युध्दात बाॅम्ब चा काही अंश तुकडा हातावर पडल्याने जखमी झाले होते. पाक युध्दातही जखमी झाले होते. बांग्लादेश मुक्ती युध्दातही सहभाग होता. दोंडाईचा येथील शिवनेरी विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ बागल व कापडणे येथील जिल्हा परीषदेच्या शिक्षिका किरण पाटील यांचे वडिल तर माध्यमिक शिक्षक पी.बी. पाटील यांचे सासरे होत.

युद्धाची माहिती देतांना अंगावर शहारे 

चिनीच्या युध्दात चिन्यांनी हिंदी चिनी भाई भाई असे म्हणून कसे फसविले. अन त्यांना तोडीस तोड उत्तर कसे उत्तर दिले. हे जेव्हा भास्करराव बागल सांगायचेत तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारे येत असे.  बागल यांनी  बाॅम्बचा तुकडा आणि गोळीचा काही भाग आजही बागल कुटुंबियांकडे संग्रहीत आहे. 
 

सैनिक दिनी मृत्यू

भास्करराव बागल यांनी चीन, पाकिस्तान, बांगलादेश मुक्ती अशा युध्दात सहभाग घेवून ते जखमी झाले होते. अशा योध्दाचा आज सैनिक दिनीच मृत्यू झाला. जिल्हाभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT