soyabeen  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : उत्पादन घटूनही धुळ्यात सोयाबीन अल्पदरात; शेतकरी आर्थिक अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : यंदा खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले, तरी बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे.

गेल्या आठवड्यात सोयाबीनला पाच हजारांपर्यंत दर मिळाला, त्यात आता घट आली आहे. सध्या तीन हजार ते चार हजार ७५० रुपये दर मिळत आहेत. (Soybean at low prices despite production decline in dhule agriculture news)

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या हाती काही फारसे आले नाही. उत्पादनात घट झाल्याने दर वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. गेल्या आठवड्यात प्रतिक्विंटल पाच हजार ते पाच हजार २०० रुपये दर मिळाला. त्यामुळे भावात आणखी वाढ होण्याची आशा होती. मात्र, गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर स्थिरावले आणि आता अचानक दरात घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दराची अशी स्थिती

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ डिसेंबरला सोयाबीनची ८७ क्विंटल आवक झाली. परिणामी, दर घसरून तीन हजार ते चार हजार ६९९ रुपये प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळाला. ७ डिसेंबरला दहा क्विंटल, तसेच ८ डिसेंबरला फक्त तीन क्विंटल आवक झाली. त्यामुळे किमान चार हजार ५७५ ते चार हजार ७७० रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार ६५० रुपये होता.

हायब्रीड सोयाबीनची केवळ चार क्विंटल आवक झाली. परिणामी, किमान तीन हजार ८०० रुपये आणि कमाल चार हजार ७०५ रुपये भाव राहिला. केंद्र सरकारने सोयाबीनला चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. बाजारात हमीभावापेक्षा दर कमी झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

उत्पादकता कमी

अवकाळी पावसामुळे अनेक भागांत यंदा सोयाबीन उत्पादकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाती एकरी तीन ते चार, तर काहींना दोन ते तीन क्विंटल सोयाबीन आले. उत्पादनखर्च निघेल एवढाही दर मिळेनासा झाला आहे. शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेमुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवली. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली.

सरकारने सोयाबीनच्या हमीभावात २०२२-२३ च्या तुलनेत तीनशे रुपयांची वाढ करून चार हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. सोयाबीनचा उत्पादनखर्च हा एका क्विंटलच्या उत्पादनासाठी तीन हजार २९ रुपये इतका गृहित धरण्यात आला आणि ५२ टक्के इतका खर्चावरील लाभ मिळाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादकता कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT