Local farmers harvesting wheat with a harvester
Local farmers harvesting wheat with a harvester  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोदा तालुक्यात गहू काढणीस वेग; योग्य भाव मिळण्याची आशा

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि. नंदुरबार) : तालुक्यातील असंख्य गावांमध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. त्या पेरणी केलेल्या गव्हाची काढणीसह मळणीस शेतकऱ्यांकडून वेग देण्यात आला आहे. दरम्यान मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. (Speed ​​of wheat harvesting in Taloda taluka nandurbar news)

मात्र सद्यःस्थितीत वातावरण निवळल्याने गहू काढणीस शेतकऱ्यांकडून वेग देण्यात आला आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता गव्हाच्या एकरी उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे.

तळोदा शहरासह तालुक्यातील चिनोदा, रांझणी, प्रतापपूर, मोड, बोरद, मोहिदा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर गहूचे उत्पादन घेण्यात येते. यंदाच्या चालू हंगामात देखील तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी गहूचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला होता. पोषक वातावरणामुळे गहू देखील शेतांमध्ये चांगलाच बहरला होता.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु, मार्च महिन्याच्या सुरवातीला तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी गहूचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यामुळे शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान भुईसपाट झालेला गहू आता काढणीला आला असून वातावरण निवळल्याने शेतकऱ्यांकडून गहू काढणीला वेग देण्यात आला आहे. काही शेतकरी मजुरांच्या साहाय्याने गहू काढणी करून थ्रेचरच्या साहाय्याने गहू काढणी करीत आहेत. तर काही शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने गहू काढणी करीत आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

दरम्यान ऐन काढणीच्या वेळेसच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गहू पिकास बसला असल्याने गव्हाचा एकरी उत्पादनात मोठी घट निर्माण येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गहूला चांगला भाव मिळावा अशी आशा गहू उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

"मार्च महिन्यात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू पीक भुईसपाट झाल्याने गहूच्या एकरी उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे काढलेल्या गव्हाला योग्य व चांगला भाव मिळावा एवढीच आशा आहे." - अरुण चव्हाण गहू उत्पादक शेतकरी, चिनोदा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT