Measles Disease sakal
उत्तर महाराष्ट्र

Measles Disease : गोवर प्रतिबंधासाठी लसीकरणाचा वेग वाढवा - धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करावे. याकरिता शोधमोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी यंत्रणेला दिले.

गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासह लसीकरणाच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की शहरात व ग्रामीण भागामध्ये संशयित रुग्ण आढळत असल्याने लसीकरणासाठी सर्वेक्षण जलदगतीने होणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागात तातडीने सर्वेक्षण करून लहान मुलांचे लसीकरणे करावे. त्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. आवश्यक तेथे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करून लसीकरण सत्रनिहाय यादी अद्यावत करावी. त्यात प्रामुख्याने गोवरवरील लसीकरणाचा समावेश करून घ्यावा. त्यानुसार आरोग्य विभागाने ग्रामीण, शहरी आणि महापालिका क्षेत्रात मोहीम राबवावी. सत्रनिहाय यादी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका यांच्यामार्फत अद्ययावत करावी.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

‘गोवर’बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास त्या भागात तातडीने शोधमोहीम राबवीत लसीकरणावर भर द्यावा. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र बालकाला गोवरसह अन्य लसीकरणाचे डोस द्यावेत. त्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी.

विशेष लसीकरण अभियान

डॉ. नवले यांनी सांगितले, गोवर रुबेला डोस पहिला आणि (एमआर १ आणि २) देण्यासाठी चार आठवड्यांच्या अंतराने मोहिमेचे दोन भागांत म्हणजे पहिला टप्पा १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२, तर मोहिमेचा दुसरा टप्पा १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ असा आहे.

येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत आपापल्या भागातील लसीकरणापासून वंचित नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील सर्व बालकांना एमआर आणि दोन डोस देणे असा विशेष लसीकरण अभियान कालावधी आहे. कुपोषण अधिक असणारे भाग, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाची वस्ती असणारे तसेच लसीकरणाला विरोध असणारे भाग अशा हॉटस्पॉट भागामध्ये लसीकरणासाठी लक्ष देण्यात येत असून, आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांनी गोवर प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्हाधिकारी शर्मा, महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. व्ही. एस. वानखेडे, धुळे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, जिल्हा बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन बोडके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT