Srpanch Sanjay Khairnar resigns
Srpanch Sanjay Khairnar resigns 
उत्तर महाराष्ट्र

सरपंच संजय खैरनार यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब!

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खैरनार यांनी 28 ऑगस्टला पंचायत समिती सभापतींकडे ठरल्याप्रमाणे राजीनामा सोपविला होता. त्यानुसार बीडीओंच्या 29 ऑगस्टच्या पत्रान्वये सत्यता पडताळणीसाठी शुक्रवारी (ता.7) सकाळी दहाला ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली. मावळते सरपंच संजय खैरनार अध्यक्षस्थानी होते.

शुक्रवारी झालेल्या विशेष सभेस 17 पैकी 16 सदस्य हजर होते. त्यात सरपंच खैरनार यांच्यासह उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नानाभाऊ पगारे, शानाभाऊ बच्छाव, नवल खैरनार, दादा भिल, प्रमिलाबाई जाधव, इंदूबाई खलाणे, पुष्पाबाई गवळे, मनीषा बागुल, सुरेखाबाई बोरसे, आशाबाई सोनवणे, सुरेखा भिल, रेवाबाई न्याहळदे, छाया कोठावदे आदींचा समावेश आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश देवरे गैरहजर होते. ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, लिपिक यादव भदाणे, योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, अनिल बागुल आदींसह गटनेते भगवान भलकारे, ईश्वर पेंढारे, मोतीलाल मोरे, भिका न्याहळदे, दौलत जाधव, भालचंद्र कोठावदे हेही यावेळी उपस्थित होते.

सर्व सदस्यांनी सरपंच खैरनार यांच्या राजीनाम्यास स्वीकृती दिली असून ग्रामपंचायतीच्या ठरावासह तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना आज पाठविण्यात आला. उपसरपंच आबा भलकारे यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड झाली. अंतिम मंजुरीनंतर तसा अहवाल पाठविण्यात येऊन सरपंच निवडीची पुढील तारीख जाहीर होईल. आगामी सरपंच, उपसरपंचपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. 

यावेळी सरपंच खैरनार यांचा सर्व सदस्यांनी सत्कार केला. सदस्यांसह सरपंच खैरनार यांनी भावुक मनोगत व्यक्त केले.

त्यात त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व कर्मचारी व गावकऱ्यांचे आभार मानले. 'सकाळ'चेही सरपंच खैरनार यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी मांडलेल्या सूचनेनुसार सर्वप्रथम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा प्रत्येकी पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली. तर दिव्यांग कर्मचारी अनिल बागुल व दिव्यांग अंगणवाडी मदतनीस संगीता सैंदाणे यांनाही सर्वानुमते ग्रामनिधीतून तीनचाकी मोटारसायकली देण्याचे ठरले. 'सकाळ'तर्फे भगवान जगदाळे यांनीही ग्रामपंचायत चौकाचे सुशोभीकरण व ग्रामपंचायत ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याची अथवा काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT