MSRTC
MSRTC 
उत्तर महाराष्ट्र

सकाळी मृत्यू, दुपारी काढले पैसे, दुसऱ्या दिवशी बॅंकेत भरणा..!

सकाळवृत्तसेवा

नाशिक - नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला सकाळी दहाला, एसटी बॅंकेच्या पंचवटी शाखेतून पैसे काढले दुपारी तीनला आणि परत भरणा केला दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला... एका मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या बॅंक खात्यावर दोन दिवस असे व्यवहार केले. हे कुणाला सांगितले तर विश्‍वास बसेल? पण हो हे सारे घडले आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेत असा प्रकार उघडकीस आला. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील कार्यशाळेतील (वर्कशॉप) कर्मचारी एच. एन. चव्हाण यांचे गेल्या २० डिसेंबरला सकाळी दहाला आकस्मिक निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्या एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील खात्यातून दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी १८ हजार रुपये काढले गेले. त्यांच्या एटीएममधून पैसे काढले गेले असते, तर संशयाला जागा होती. मात्र बॅंकेतील पैसे काढण्याच्या (विड्रॉल स्लिप)द्वारे ते पैसे निघाल्याने संशय बळावला. 

मृत्यूच्या दिवशी पैसे काढण्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. विशेष म्हणजे मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, २१ डिसेंबरला पुन्हा बॅंकेत तशाच स्लिपद्वारे ते १८ हजार रुपयेही पुन्हा भरले गेले. 

मृत्यूनंतर बॅंकेत जाऊन कामकाज करविणाऱ्या महाभागाचा शोध सुरू आहे. बॅंकेतील नोकरीशिवाय व्याजाने पैसे देऊन अवैध सावकारीतून हा गैरप्रकार घडल्याची चर्चा आहे.

तो मंगेश कोण? 
मृत सभासदाला दिलेले पैसे बुडू नयेत म्हणून मृताच्या निधनानंतर अंत्यसंस्कारापूर्वीच पैसे काढून घेण्यासारख्या कुप्रथांची चर्चा आहे. मात्र हे प्रकरण अंगलट येणार याची खात्री होताच, पुन्हा त्याच बॅंक खात्यावर १८ हजार रुपये भरून संशयिताने केलेल्या कृतीतून बुडत्याचा पाय आणखीन खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे. मंगेश नावाने तो भरणा झाला. त्याचे पितळ आता उघड पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जागृत सभासदांनी याबाबत चौकशीची मागणी करून मृताच्या नावावर परस्पर पैसे काढणे, परत भरणा करणे हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एसटी कर्मचारी बॅंकेत सातत्याने चुकीचे कामकाज उघडकीस येत आहे. त्यामुळे बॅंकेवर प्रशासक नियुक्त झाल्याशिवाय येथील प्रशासन सुधारणार नाही.
- श्रीरंग बर्गे, एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस

ज्या कोणी चूक केली असेल त्याला कदापि पाठीशी घातले जाणार नाही. संशयास्पद व्यवहाराची निश्‍चित प्रशासकीय चौकशी केली जाईल.
- विजय पवार, संचालक, एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT