Stamp esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पूर्वीप्रमाणेच हस्ते पद्धतीने मुद्रांक खरेदी-विक्री होणार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : विविध कारणांसाठी १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक (स्टॅम्पपेपर) खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहाण्याची अट अखेर प्रखर विरोधानंतर मागे घेण्यात आली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी तसा आदेश गुरुवारी (ता. ६) जारी केला. (Stamps will be bought and sold manually as before dhule news)

पूर्वी मुद्रांक खरेदी अर्जदाराच्या वतीने नातेवाईक किंवा मित्र कोणीही करू शकत होते. मात्र, १ एप्रिलनंतर ज्यांना मुद्रांक खरेदी करायचे आहेत, त्यांनी प्रत्यक्ष खरेदीवेळी हजर राहावे व वेंडरकडील रजिस्टरवर प्रमाणित स्वाक्षरी करावी, असा आदेश अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक सतीश देशमुख यांनी जारी केला होता.

त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र, या निर्णयाला दस्तलेखक व मुद्रांक विक्रेता संघटनेसह वकील संघटनेने विरोध केला आणि खरेदीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे मुद्रांक खरेदी झाली नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या निर्णयावरून नागरिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच या निर्णयामुळे मुद्रांक खरेदी करताना विक्रेत्यांना अडचणी येत होत्या. खरेदीदारांची गैरसोय होऊ लागली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी कसरत करावी लागणार होती.

या नागरिकांना स्वत: मुद्रांक खरेदीसाठी जावे लागणार होते. या स्थितीची तातडीने दखल घेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हर्डीकर यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच हस्ते पद्धतीने मुद्रांक खरेदी विक्री होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT