Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : राज्य माहिती आयोगाचा धुळे महापालिकेला दणका

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेतील विविध विभागांच्या माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदे, दूरध्वनी क्रमांक याबाबतचे फलक लावण्यासंदर्भात मागविलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने महापालिकेला राज्य माहिती आयोगाने दणका दिला. (State Information Commission taken action against Municipal Corporation for refusing to provide requested information dhule news)

आस्थापना विभागाचे कार्यालय अधीक्षक तथा तत्कालीन जनमाहिती अधिकारी रमजान अन्सारी यांच्याकडून आयुक्तांनी कारवाई का करण्यात येऊ नये या संदर्भातील लेखी खुलासा घ्यावा, असे सूचित केले आहे. खुलासा न केल्यास दंड ठोठवावा, असे आदेश आयुक्तांनी माहिती आयोगाने दिले.

नवजीवननगर, लेनिन चौक, फाशीपूल धुळे येथे महापालिकेतील मुख्य ठिकाणी विविध भागांच्या, विविध विभागांच्या माहिती अधिकारी यांचे संपूर्ण नाव, अधिकारपद, दूरध्वनी क्रमांकासह संपूर्ण पत्ता माहिती असलेला फलक लावला असल्यास त्याबाबतची माहिती योगेश मुकुंदे यांनी मागितली. महापालिकेने ती मुदतीत दिली नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यामुळे श्री. मुकुंदे अपिलात गेले. तिथे माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली. माहिती आयोगाने श्री. मुकुंदे यांची मागणी योग्य मानली. विहित मुदतीत खुलासा प्राप्त झाला नाही, तर शास्तीचे आदेश कायम करावेत, असे आदेश माहिती आयोगाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT