Shubham Gupta speaking at the Disability Survey Training Workshop. Neighbors Devendra Patil, Manish Pawar, Sanjay Sonwane etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दिव्यांग बालकांना प्रवाहात आणा : सीईओ गुप्ता

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत दिव्यांगांची संख्या कमी आहे. मात्र, सर्वेक्षणाअभावी नोंद न होऊ शकलेली अनेक दिव्यांग बालके असण्याची शक्यता आहे.

त्यांना शोधून नोंदणी करून घेणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मिशन संवेदनाचा प्रमुख उद्देश आहे, असे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांनी सांगितले.(statement of CEO Gupta Streamline children with disabilities dhule news)

मिशन संवेदनांतर्गत दिव्यांग सर्वेक्षण प्रशिक्षणाला येथील राजगोपाल भंडारी सभागृहात सुरवात झाली. सीईओ गुप्ता यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण अधिकारी मनीष पवार, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, सहाय्यक अधिकारी सुवर्णा पवार, गटशिक्षणाधिकारी गणेश सुरवाडकर, सरिता पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, कुष्ठरोग अधिकारी बापू अमृतकर, महात्मा गांधी सेवा संघाचे कान्हेकर, शिरसाट आदी उपस्थित होते.

घरोघरी सर्वेक्षण

श्री. गुप्ता म्हणाले, की दहा टप्प्यांमध्ये मिशन संवेदना राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दिव्यांगांची माहिती उपलब्ध करण्यासाठी आशा वर्कर्सना घरोघरी सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. त्याद्वारे दिव्यांगांची माहिती एकत्र केली जाईल.

ती अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. नंतर दिव्यांगाना स्वतंत्र ओळख मिळवून देणे, त्यांना योजनांचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले जाईल.

कामासाठी मानधन

आशा वर्कर्सना कार्यक्षेत्रातील कुटुंबांचा तपशील ठाऊक असतो. त्यामुळे सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांना दिली आहे. या कामांतर्गत आशा वर्कर्स दिव्यांग स्नेही म्हणून काम करणार असून, त्यापोटी त्यांना प्रतिकुटुंब चार रुपये, तर प्रतिदिव्यांग दोन रुपये मानधन दिले जाणार असल्याचे श्री. गुप्ता यांनी सांगितले.

अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण

दिव्यांग सर्वेक्षणासाठी महात्मा गांधी सेवा संघाने तयार केलेल्या अ‍ॅपचा वापर होईल. याद्वारे गोळा केलेल्या माहितीनंतर संबंधितांना लाभ दिला जाईल. या अ‍ॅपच्या वापराबाबत गांधी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मनीष पवार यांनी मिशन संवेदनाच्या दहा टप्प्यांबाबत माहिती दिली. मनोहर वाघ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी आभार मानले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT