civil hospital dhule  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Civil Hospital : ‘सिव्हिल’ला आणखी 500 खाटा : आमदार शाह

सकाळ वृत्तसेवा

Dhule Civil Hospital : शहरातील मध्यवर्ती साक्री रोडवर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची (सिव्हिल) क्षमता पाचशे बेड करण्याबरोबर आधुनिकतेसाठी मंजुरी व निधीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

त्यास जनहितासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्यहित जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहे.(statement of MLA Shah 500 more beds for Civil hospital dhule news )

कोरोनाकाळात जिल्हा शासकीय रुग्णालय, हिरे मेडिकलचे जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, महापालिकेच्या दवाखान्यांसाठी सॅनिटायझर, औषधे व इतर साहित्य खरेदीसाठी कोट्यवधींचा निधी शासनाकडून आणला होता.

तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी १०० ते ३०० खाटांच्या विस्तारासाठी नऊ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. तसेच जिल्हा रुग्णालयातील प्रसूतिगृहाच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने निधी दिला होता.

हिरे मेडिकल व सर्वोपचार रुग्णालय शहरापासून लांबवर असल्याने रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय होते. त्यामुळे शहरातील सिव्हिल रुग्णालयाची श्रेणीवाढ व अद्ययावतीकरण करणे अत्यावश्यक होते.

ते लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाचशे खाटांच्या विस्तारीकरणाची मागणी केली. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणीला हिरवा कंदील दिल्याचे आमदार शाह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT