sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : घरातच थांबा अन् उष्माघात टाळा..! ही काळजी घ्या

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : आगामी दिवसांमध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले. (Stay indoors and avoid heat stroke nandurbar news)

नंदुरबार जिल्हा उष्मालाटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे मागील दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून जिल्ह्यात विशेषतः मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होताना दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात ही वाढ मे २०२३ च्या अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उष्मालाटेमुळे मानव, पशु-पक्षी व शेती पिकांवर विविध दुष्परिणाम उद्‍भवतात म्हणून नागरिकांनी आरोग्याची/उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी.

उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, वारंवार तहान लागणे, शरीर शुष्क होणे व थकवा येणे, ताप येणे १०२ पेक्षा अधिक जास्त ताप वाढणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचेन अवस्था होणे, कधी-कधी बेशुद्धावस्था किंवा उलटी होणे, शरीराचे तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मानवी शरीराच्या अंतर्गत विविध बदल होऊन शरीराचे नियंत्रण कमी होते. वेळप्रसंगी मनुष्याचा मृत्यूही होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उष्माघात टाळण्यासाठी काय करू नये

दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे/परिधान करणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. उन्हात वाहने शक्यतो चालवू नयेत. ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.

उष्माघात बचावासाठी हे करावे

तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे, हलके, पातळ, सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असताना टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा किवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे, लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी नियमित सेवन करावे, गुरांना व पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवात, अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी, काँक्रिट घराचे छतावर पांढरा रंग द्यावा, टीन पत्र्याच्या छतावर गवताची पेंढी/धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवावीत.

हेल्पलाइनवर संपर्क साधा

उष्माघात झालेल्या व्यक्तीस किंवा उष्माघाताची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीस तत्काळ मदत करावी. त्याचे शरीर ओल्या कपड्याने पुसून शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. मदतीसाठी अॅम्ब्युलन्ससाठी १०८, ११२, १०२, १०७७ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT