dagadfek.jpg
dagadfek.jpg 
उत्तर महाराष्ट्र

महसूल पथकावरच दगडफेक!..नेमके कारण काय?

सकाळवृत्तसेवा

नाशिक : सायने बुद्रुक (ता. मालेगाव) शिवारातील गट क्रमांक 275 व 376 येथील खानपट्टा तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, सायने बुद्रुक येथील तलाठी नामदेव पवार यांच्यासमवेत असलेल्या महसूल विभागाच्या पथकावर अवैधरीत्या दगड वाहतूक करणाऱ्या दहा ते बारा ट्रॅक्‍टरचालकांनी दगडफेक केली. गुरुवारी (ता. 23) दुपारी पावणेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांनी निषेध केला. 

असा घडला प्रकार...

श्री. पाटील व सहकारी खानपट्टा तपासणीसाठी आले होते. दोन खानपट्ट्यांतील तपासणी करताना या पट्ट्यात सहा ट्रॅक्‍टर उभे होते. त्याजवळ दहा ते बारा अनोळखी उभे होते. तपासणी करताना तलाठी पवार यांच्यासह मंडल अधिकारी, काही तलाठीदेखील होते. संबंधितांनी ट्रॅक्‍टरचालक, मालकांना खनिज परवान्याबाबत विचारणा केली. संबंधितांनी नाव, पत्ता सांगण्यास नकार देत ट्रॅक्‍टर पळवून नेले. अन्य दहा ते बारा संशयितांनी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. 

तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल 

याबाबत माहिती समजताच पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, उपनिरीक्षक जयसिंग राजपूत व सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करत परिसरात संशयितांचा शोध घेतला. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास तलाठी पवार यांनी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तालुका पोलिस ठाण्यात दगडफेक करणाऱ्या अनोळखींविरुद्ध शासकीय कामात अडथळा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT