Nandurbar News : Panchnama of loss started by revenue and agriculture department in taluka; Estimated loss of crops on about 400 hectares esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : वादळामुळे सुमारे 400 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याच्या अंदाज; पंचनाम्याला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यात रविवारी (ता. ४) सकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यांना महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने सुरवात केली असून, या वादळामुळे सुमारे ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यात गेल्या चार ते पाच महिन्यांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे सातत्याने पिकांचे नुकसान होत होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची मदत मिळत नाही तोच पुन्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. (Strom rain Estimated damage to crops on about 400 hectares From Revenue in Shahada Taluka Commencement of damage assessment Nandurbar News)

रविवारी आलेल्या जोरदार वादळामुळे अक्षरशः शेतांमध्ये पिके जमीनदोस्त झालेली आहेत. त्यात सर्वाधिक नुकसान केळी पिकांचे झालेले आहे. शहादा तालुक्यात साधारणता पाच हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड केली आहे. याव्यतिरिक्त मका पिकाचेदेखील नुकसान झाले आहे.

या वादळामुळे तालुक्यात ग्रामीण भागात शेतांमधील उभी केळीची झाडे जमिनीवर आडवी पडली. केळीचे घडच्या घड जमिनीवर पडून इकडेतिकडे फेकले गेले होते.

हातातोंडाशी आलेला घास पुन्हा नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतलेला आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

त्या आधारावर लागलीच नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. काहींची केळी शेताच्या बांधावर ठेवली जात होती. काही शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू होते. काही व्यापाऱ्यांच्या गाड्यादेखील शेतात उभ्या होत्या.

अशा स्थितीत अचानक वादळ आल्याने सारे काही जमीनदोस्त झाले. नुकसान झालेली केळी तसेच खराब झालेली केळी व्यापारी आता मातीमोल घेतील, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"गेल्या वर्षी केळी पीक लावले होते. साडेअकरा महिन्याची केळी झालेली होती. व्यापारी केळी काढण्यासाठी गाड्या घेऊन शेतात आलेले होते. मजूरदेखील शेतातच होते. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे सारे काही जमीनदोस्त झालेले आहे.

शेतातील केळीची झाडे पूर्णतः आडवी पडली. तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन बँकांचे कर्ज शेतीसाठी काढले आहे. पुढच्या वर्षी मुलींचे लग्न करायचे आहे. अशा परिस्थितीत केळी पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन केवळ घोषणाबाजी न करता तत्काळ भरपाई दिली गेली पाहिजे."

-माधवराव पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी

"शहादा तालुक्यात वादळामुळे नुकसानग्रस्त शेतीचे व इतर बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व भागात महसूल कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू आहेत."

-दीपक गिरासे, तहसीलदार, शहादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT