death esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सावकारी जाचाला कंटाळून शिरपूरला विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी घडली. विश्वजीत विनोद राठोड (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने गुरुवारी (ता.२७)सायंकाळी सावळदे (ता.शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकली होती. (student death in Shirpur after fed up with moneylenders dhule news)

मांडळ (ता.शिरपूर) शिवारातील साईबाबा अपार्टमेंटसमोर विश्वजीतचे घर आहे. त्याचे वडील विनोद राठोड (कन्नड जि. औरंगाबाद) तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. शहरातील एका महाविद्यालयात विश्वजीत अकरावीच्या वर्गात शिकत होता. २६ जानेवारीला दुपारी दोन जण त्याच्या घरी गेले.

त्यांनी पैशांवरून विश्वजीतशी वाद घातला. त्यानंतर संतापाच्या घरात तो मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला. तो उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या आईने पती विनोद यांना फोन करून माहिती दिली. विनोद राठोड यांनी त्यांच्या मित्रांना शोध घेण्यास सांगितले.

शोध घेत असताना सायंकाळी साडेसहाला तापी नदीवरील पुलावर त्याची मोटारसायकल उभी दिसली. त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध सुरु झाला. शुक्रवारी (ता.२७) त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर तेथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. बीड जिल्ह्यातील माजलगाव या मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

विश्वजीतच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध सावकारांकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा विश्वजीतने हवाला घेतला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करू शकल्यामुळे सावकारांनी विश्वजीतमागे तगादा लावला होता. काही हजार रुपयांच्या कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी त्याच्याकडे करण्यात आली होती.

या त्रासाला कंटाळून विश्वजीतने आत्महत्या केल्याचा संशय आहे. शहरात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छोटी कर्जे देऊन सावकारी पाशात अडकवून अव्वाच्यासव्वा व्याजाने वसुली करणारी टोळी असून त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थी गोत्यात आल्याची चर्चा आहे. मृत विश्वजीतच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असे कुटुंब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live: छगन भुजबळांचा बालेकिल्ला एकनाथ शिंदे हिसकवणार... आज होणार फैसला

Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?

Chandrapur News: किडनी विक्रीच्या जाळ्यात बांगलादेशातील तरुण; पीडितांमध्ये राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेशचे युवक

Latest Marathi News Live Update: दिल्लीचा AQI आज ४०० पेक्षा जास्त; विषारी हवेने राजधानीला वेढले

Panchang 21 December 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT