unesco.jpg 
उत्तर महाराष्ट्र

या' शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार जपानला प्रतिनिधित्व करण्याची संधी

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा

सटाणा  : ताहाराबाद (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय संस्था यूनेस्को क्लब असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या क्लब अंतर्गत विद्यालयातील सहा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर जपान येथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यालयात यूनेस्को क्लब असोसिएशनची स्थापना

यूनेस्को स्कूल क्लब ही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था यूनेस्कोची चळवळ आहे. या अंतर्गत जगभरातील शाळांना जोडून तेथील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले गुणदर्शन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. या उद्देशाने मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात यूनेस्को क्लब असोसिएशनची स्थापना करण्यात आली. युनेस्को क्लब ऑफ इंडियातर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दौलतराव गांगुर्डे व संस्थेच्या सचिव अंजलीताई गांगुर्डे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या क्लब अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला व निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांपैकी विजेत्या विद्यार्थ्यांना जपान येथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हर्षल पाटील आदींसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

युनेस्को क्लब अंतर्गत जपान येथे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी 

अनन्या जाधव (पहिली), यशश्री पगारे, वैष्णवी गवळी, शिवानी भामरे ( इयत्ता चौथी), मयुर साळवे, निकिता देसले, भूमिका कोठावदे, श्रेयस खैरनार, देवेश पवार, दिक्षा खैरनार (सर्व इयत्ता तिसरी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT