While felicitating Deepali Patil, Sub-Inspector Chhaya Patil, Rahul Randhe, Sub-Inspector Hemant Khairnar, Anil Gujar etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

PSI Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

सकाळ वृत्तसेवा

PSI Success Story : शिरपूर, ता. १६ : रिक्षाचालक वडिलांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी असताना शेतकऱ्याशी लग्न झाले. पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबत असतानाच तिने हातातील पुस्तकही सोडलं नाही.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवून तिने पोलिस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण केले. (Success of Deepali Patil from Arthe in MPSC PSI dhule)

अर्थे (ता.शिरपूर) येथील दीपाली समाधान पाटील हिची ही यशोगाथा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा तिने उत्तीर्ण केली. तिच्या यशाबद्दल गावकऱ्यांतर्फे गावात मिरवणूक काढण्यात आली.

घराघरातून औक्षण केल्यानंतर नागरी सत्कार करण्यात आला. पंतप्रधान आत्मनिर्भर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे अध्यक्षस्थानी होते.

पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, बोराडीचे सरपंच सुखदेव भिल, माजी गटनेते अनिल गुजर, माजी सरपंच दीपाली पाटील, कुव्याच्या माजी सरपंच कल्पना पाटील, दीपाली पाटील हिचे आई-वडील ज्योती सूर्यवंशी व निंबा सूर्यवंशी, सासरे तथा माजी सरपंच सोमा गुजर, सासू सिंधूबाई गुजर, पती समाधान पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राहुल रंधे म्हणाले की, दीपाली पाटील यांचे यश संपूर्ण महिलांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागात राहूनदेखील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. छाया पाटील म्हणाल्या की, मुलींनी मुलांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरून स्वतःला सिद्ध केले पाहिजे.

उपनिरीक्षक खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर करतांना सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले. निवृत्त प्राचार्य आर.बी.महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना दीपाली पाटील यांनी सासर व माहेरून उत्तेजन मिळाल्याने यशासाठी प्रयत्न करणे शक्य झाल्याचे सांगितले.

विनोद पाटील यांनी प्रास्तविक, संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुनील पाटील यांनी आभार मानले. ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, रवींद्र पाटील, शांताराम पाटील, सत्यपाल गुजर, सुरेश गुजर, संदीप पाटील, अशोक पाटील, हेमंत पाटील , भागवत चौधरी, विमलबाई पाटील व अनिल भाऊ युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT