Gokul Bedse, Dinesh Thackeray and villagers felicitating Chandrakant Patil, who overcame blindness and got a job in the railways. esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : अंधत्वावर मात करत रेल्वेत मिळविली नोकरी! चंद्रकांत पाटील झाला वर्कशॉप असिस्टंट

सकाळ वृत्तसेवा

Success Story : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पूर्ण अंधत्वावर मात करत कर्ले (ता. शिंदखेडा) येथील दृष्टिहीन चंद्रकांत कृष्णा पाटील या तरुणाने रेल्वेत वर्कशॉप असिस्टंटपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुंबई पश्चिम रेल्वेमध्ये नोकरी मिळविली. (Success Story Got job in Railways after overcoming blindness Chandrakant Patil became Workshop Assistant dhule news)

अंधत्व असून आपल्याला काहीतरी करायचे आहे आणि करूनही दाखवायचे आहे ही जिद्द, परिस्थिती जेमतेम, अंधत्व नशिबी आलेले मात्र अशा स्थितीत न डगमगता दहावीपर्यंतचे शिक्षण धुळे येथील अंधशाळेत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे येथील एसएसव्हीपीएस कॉलेजला घेतले.

पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण दोंडाईचा येथील पी. बी. बागल कॉलेजमध्ये घेतले. शिक्षण झाले. पुढे काय, हा प्रश्न होताच. कोरोनाच्या काळात पितृछत्र हरपले. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. लहान भाऊ सुरतेला मार्केटमध्ये काम करतो.

दोन वर्षांपूर्वी एका अंध मुलीशी विवाहही झाला. लहानशा गावात थंड पेयाचे दुकान आहे. गावात पोटाची खळगी भरण्यासाठी थंड पेयाचा व्यवसाय टाकला. सामाजिक कार्याची आवड होती. राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या विभागीय सचिवपदावर काम करत असताना अंध व्यक्तीसाठी विविध योजनांचा फायदा करून द्यायचा.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे सामाजिक काम सुरू होते. रेल्वेत नोकरी लागल्याने रुजू होण्यासाठी १७ तारखेला रवाना होण्यापूर्वी त्यांचा कर्ले गावाचे उपसरपंच गोकुळ बेडसे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश ठाकरे, सुभाष वाघ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्या वेळी भास्कर चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, नितीन देवरे, देवीदास पाटील, सदाशिव पवार, परमेश्वर पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रवीण चव्हाण, भय्या चव्हाण, लोटन चव्हाण, चंद्रकांत यांची आई अरस्तोलबाई पाटील, पत्नी दीपाली चव्हाण आदी उपस्थित होते. गावासह परिसरातून चंद्रकांत पाटील यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: नाइन्टी मारली अन् अंगात आणली... PMPL बस अडवली! पुण्यातील मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल

Farmers Desperate : 'दर पडल्याने शेपू, कोथिंबिरीवर फिरविला रोटावेटर'; शेतकरी हतबल, भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

Latest Marathi News Updates : अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

Maharashtra ITI: शासकीय आयटीआय देणार ‘दत्तक’; कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे कार्यवाही

Solapur Crime : आगरवाल हल्लाप्रकरणी सहा जणांना पोलिस कोठडी; २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT