Dhule: Sunil Nerkar, Rajendra Chitodkar, Ajay Kasodekar, Dilip Pakhale etc. felicitated Prathamesh Kotkar, father Rajendra Kotkar, mother Chaya Kotkar for their success in MPSC. esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : भाजी विक्रेत्याचा मुलगा MPSCतून अभियंता

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यश मिळवीत येथील प्रथमेश कोतकर यांनी जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पद मिळविले आहे.

लवकरच जलसंपदा विभागात कार्यरत होणार असून आई-वडिलांच्या परिश्रमामुळे आणि संस्कारांमुळे मी यशस्वी होऊ शकलो, अशी भावना प्रथमेश कोतकर यांनी व्यक्त केली. प्रथमेशचे वडील राजेंद्र कोतकर हे शहरात किरकोळ स्वरूपात भाजी विक्री करतात. (Success Story Son of vegetable seller an engineer from MPSC Dhule News)

राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता या पदासाठी झालेल्या परिक्षेत शहरातील प्रथमेश कोतकर यांनी यश मिळविले आहे.

त्यांची आई छाया कोतकर या पती राजेंद्र यांना त्यांच्या परीने मदत करीत असतात. प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र आणि छाया कोतकर यांनी प्रथमेशला शिकविले. प्रथमेश यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण येथील न्यू सिटी हायस्कूलमध्ये झाले आहे.

बारावी जयहिंद सीनिअर कॉलेज, तर छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिलची पदवी घेतली आहे. त्यांनी एमपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ८७ वा रँक मिळविला. ते जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (श्रेणी- २, राजपत्रित) पदी रुजू होतील.

तत्पूर्वी, अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळविल्यानंतर प्रथमेश यांनी मुंबईत लोढा ग्रुपमध्ये दोन वर्षे काम केले. ॲमेझॉनमध्ये दीड वर्षे काम करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांचा लाडशाखीय वाणी समाजातर्फे मंगळवारी (ता. २७) सत्कार झाला.

वाणी समाजाचे नेते सुनील नेरकर, राजेंद्र चितोडकर, दिलीप पाखले, अजय कासोदेकर, शिक्षिका रोहिणी कुलकर्णी, वडील राजेंद्र कोतकर, आई छाया कोतकर व समाजबांधव आदी उपस्थित होते. श्री. नेरकर म्हणाले, की प्रथमेश यांच्या यशामुळे लाडशाखीय वाणी समाजाचे नाव उंचावले असून पुढेही अभ्यास सुरू ठेवत त्यांनी जिल्हाधिकारी संवर्गातील उच्चपदासाठी परीक्षा द्यावी व यश मिळवावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT