dhule zp  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जमिनीसंबंधी बनावट मृत्युपत्र; माजी ZP अध्यक्ष सुधीर जाधव यांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

धुळे : नगाव (ता. धुळे) शिवारातील गट क्रमांक ३२५/४ जमिनीसंबंधी बनावट मृत्युपत्र तयार करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव यांची फसवणूक करण्यात आली.

या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. (Sudhir Jadhav was cheated by creating fake will related to land dhule news)

याआधीच गुन्ह्यातील तीन संशयित गजाआड आहेत. उर्वरितांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाकडे केला होता. न्यायालयाने त्या संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला.

नगाव (ता. धुळे) शिवारातील शेतजमिनीच्या व्यवहारात जाधव यांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात संजय झिंगा अहिरे, दिनेश ऊर्फ दिलीप शिवाजी कापुरे, राजेंद्र झिंगा अहिरे, योगेश अहिरे, ललित बर्डे, पारेगाबाई कापुरे, उमेश कापुरे यांनी फसवणूक केली. संशयितांनी मृत सुंदरबाई, तिचा भाचा शिवाजी कापुरे यांच्या नावे बनविलेल्या मृत्युपत्रात फेरफार केली.

त्यामध्ये संशयित पारेशाबाई कापुरे, दिनेश कापुरे, उमेश कापुरे, बायजाबाई मोरे हे त्यांचे वारस दाखवून बनावट कागदपत्रे बनविली. यात संशयित संजय अहिरे, राजेंद्र अहिरे, योगेश अहिरे आणि ललिता बर्डे हे संमतीपक्ष आहेत, तर संशयित मनोज पवार व संदीप पवार साक्षीदार आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

फसवणुकीचा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. याद्वारे संशयित संजय अहिरे, दिनेश कापुरे आणि राजेंद्र अहिरे यांना २२ फेब्रुवारीला अटक झाली होती. अन्य संशयित योगेश अहिरे, ललिता बर्डे, मनोज पवार, संदीप पवार, पारेगाबाई कापुरे, उमेश पवार आणि बायजाबाई मोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

यावर न्यायालयीन सुनावणी होताना न्यायालयाने संशयितांनी केवळ फिर्यादीचीच नव्हे, तर न्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचे स्पष्ट करून त्यांना कोठडीत ठेवून चौकशी आवश्यक असल्याने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी हे प्रकरण योग्य नाही, असे सांगत सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT