Sugar cane
Sugar cane esakal
उत्तर महाराष्ट्र

प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतात 7 फूट असलेले उसाचे पीक

सकाळ वृत्तसेवा

वार्सा : पारंपारिक ऊस लागवड पद्धतीत साधारणतः अडीच ते चार फूट रुंदी ची सरी घेऊन एकरी सरासरी ४० टन उत्पन्न घेतले जाते. मात्र देशशिरवाडे येथील सेवानिवृत्त उपअभियंता प्रयोगशील शेतकरी राजेंद्र शिरवाडकर यांनी तब्बल सात फूट रुंद सरी घेऊन ‘फुले २६५’ या वाणाची आडसाली ऊस लागवड १५ ऑगस्ट २०२१ ला केली आहे. उसाची पाहणी करण्यासाठी ऊस संशोधन संदर्भात भारतातील नामांकित संस्था पुणे येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

शिष्टमंडळात या संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ बी. एच. पवार, कीटकशास्त्रज्ञ के. डी. शितोळे, कृषी मदतनीस विक्रम चव्हाण यांचा समावेश होता. द्वारकाधीश साखर कारखाना लि. शेवरे(सटाणा) येथील प्रमुख ऊस विकास अधिकारी श्री. कर्पे, श्री. एन. एस. कापडणीस, सर्जेराव गांगुर्डे, जी. एस. चौरे, बी. डी. गांगुर्डे, ज्ञानेश्वर नंदन, मनीष शिरवाडकर उपस्थित होते.

एकरी शंभर टनाचे उद्दिष्ट

श्री. शिरवाडकर यांनी लागवडी पूर्व उभी व आडवी ना़ंगरटी, हिरवळीचे खत, साखर कारखान्यातील पेंट वाँश, प्रेस मड चा वापर, दोन डोळा टिपरी, दोन टिपरीत पाच इंच अंतर, रासायनिक व जैविक खताचा संतुलित वापर व ठिबक सिंचन वापर करून एकरी शंभर टन उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. श्री. शिरवाडकर यांनी यापूर्वी उसाचे सलग सात खोडवे घेतले आहेत. तसेच मागील वर्षी सोयाबीन पिकाचा यशस्वीरित्या खोडवा घेऊन भरघोस उत्पन्न घेतले आहे. श्री. शिरवाडकर यांनी केलेल्या अभिनव व नावीन्यपूर्ण शेतीचे कौतुक होत आहे. एकरी शंभर टन उत्पन्नासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे चे माजी ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने, द्वारकाधीश साखर कारखाना शेवरे (सटाणा) यांचे मार्गदर्शन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT