Sunflower crop blooming in Sanket Jain's farm. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : सूर्यफुलाचे उत्पादन कापसापेक्षा फायदेशीर; शेतकऱ्यांचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : धुळे तालुक्यात कापूस आणि मकाबरोबरच सूर्यफुलाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. खरिपासह रब्बीतही पेरा वाढता आहे. नव्वद-शंभर दिवसात येणारे हे पीक कापसापेक्षा अधिक उत्पादन देत आहे.

शेतकऱ्यांचा कलही बदलता आहे. अधिक उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पिके घेतली जात आहेत. शेतकरी प्रयोगशील बनले आहेत.

त्यांनी रब्बीतही सूर्यफुलाचे क्षेत्र वाढविले आहे. धुळे तालुक्यात शेकडो एकरावर सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जात आहे. (Sunflower production more profitable than cotton Farmer experiment Dhule Agriculture News)

धुळे तालुक्यात रब्बीतही सूर्यफूल

तालुक्यात कापूस आणि मक्याचे अधिक उत्पादन घेतले जाते. खरिपात आता सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तर रब्बीत गहू, हरभरा, दादर, मक्याबरोबरच सूर्यफुलाचे क्षेत्रही वाढले आहे.

आता शेतकरी उत्पादनाच्या बाबतीत विविध प्रयोग करु लागले आहेत. कायमच तेच ती पिके घेतल्याने जमिनीचा कस कमी झाला आहे. म्हणून शेतकरी इतर पिकांकडे वळत असल्याचे शेतकरी संदीप पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दरम्यान, सूर्यफूल हे तीन ते साडेतीन महिन्यात निघते. प्रती क्विंटलचा भावही सात हजारापेक्षा अधिक आहे. एकरी दहा क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन निघत असल्याचे आत्माराम पाटील यांनी सांगितले. येत्या खरीप हंगामात सूर्यफुलाकडे वाढता कल असणार असल्याचे, शेतकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे.

सूर्यफुलाचा सांभाळ अधिक

सूर्यफुलाचे पीक परवडणारे आहे. मात्र त्याचा सांभाळ अधिक करावा लागतो. इतर पक्षांपेक्षा पोपटांचे आवडते खाद्य आहे. ज्या सूर्यफुलावर बसले. त्यातील सर्वच बिया फस्त करतात. म्हणून दिवसभर राखण करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT