Suryakant More esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अधिकारी मारहाण प्रकरणी; 14 दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे (जि. धुळे) : येथील महसूल मंडळ अधिकारी सूर्यकांत मोरे चिमठाणे येथील कार्यलयात ९ नोव्हेंबरला रात्री एकच्या सुमारास थांबलेले असताना अज्ञातांनी जबर मारहाण केल्याने त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौदा दिवस उलटूनही शिंदखेडा पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Suryakant More Officer assault case Even after 14 days no case been filed Dhule Latest Crime News)

श्री. मोरे रात्री उशिरापर्यंत येथील कार्यालयात थांबले असता रात्री एकच्या सुमारास अज्ञातांनी कार्यालयात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत करून कार्यलयातील टेबल व खुर्च्यांची मोडतोड करून नुकसान केले. कार्यलयातून आरडाओरडा करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात येऊन रक्तबंबाळ स्थितीत पडले असताना गावातील काही तरुणांनी चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक प्रशांत पवार व कर्मचारी विनोद बर्डे यांनी शासकीय वाहनातून शिंदखेडा येथे नेल्यानंतर श्री. मोरे यांच्या मुलाने धुळे येथील खासगी रुग्णालयात नेले.

धुळे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. घटनेला १४ दिवस होऊनही शिंदखेडा पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

"चिमठाणे महसूल मंडळ अधिकारी सूर्यकांत मोरे यांना झालेली मारहाण ही त्यांची खासगी बाब असल्याने त्याच्याशी महसूल प्रशासनाचा कुठलाही संबंध नाही."

-आशा गांगुर्डे, प्रभारी तहसीलदार, शिंदखेडा

"धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले चिमठाणे महसूल मंडळ अधिकारी सूर्यकांत मोरे यांना अज्ञातांनी मारहाण केली आहे, पण अद्याप त्यांनी फिर्याद दिलेली नाही. फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल."

-सुनील भाबड, पोलिस निरीक्षक, शिंदखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT