Swami Giri Maharaj leaving for the Narmada Parikrama by paying obeisance.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ‘ते’ करतायत दंडवत-प्रणामाने नर्मदा परिक्रमा! गावोगावी कुतूहल...

सम्राट महाजन

Nandurbar News : अध्यात्माला दुर्दम्य इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणाची साथ लाभली तर असाध्य गोष्टही साध्य होऊ शकते आणि त्याचाच प्रत्यय नर्मदा परिक्रमा करणाऱ्या एका भाविकाकडे पाहून येत आहे. (Swami Giri Maharaj has set out to complete Narmada Parikrama by bowing down nandurbar news)

स्वामी गिरी महाराज हे दंडवत-प्रणाम करीत नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी निघाले आहेत. त्यांची ही तपश्चर्या व साधना पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असून, गावोगावी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.नर्मदा परिक्रमा करून नदीकिनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने मानवाला पुण्य मिळते, अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे.

त्यामुळे अनेक साधू, संत, भक्त, नागरिक धार्मिक आस्था मनात घेऊन नर्मदा परिक्रमेसाठी दर वर्षी जातात. दरम्यान, परिक्रमा करणारे काही भाविक ही परिक्रमा पदयात्रेने पूर्ण करतात, तर काही भाविक मात्र ही परिक्रमा लोटांगण घालत किंवा दंडवत, प्रणाम करीत किंवा वेगवेगळा मार्ग निवडत पूर्ण करीत असतात.

असेच एक भाविक चक्क जवळपास अडीच वर्षांपासून दंडवत, प्रणाम करीत नर्मदेच्या परिक्रमेसाठी निघाले आहेत. परिक्रमेचे अंतर शंभर-दीडशे नव्हे तर तब्बल सोळाशे किलोमीटर आहे. पण अध्यात्मावर विश्वास असल्याने ते अंतराचा विचार न करता नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

स्वामी गिरी महाराज यांनी २०२० मध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून अमरकंटक येथून नर्मदा परिक्रमेला सुरवात केली आहे. स्वामी गिरी महाराज एकटेच नर्मदा परिक्रमेला निघाले असून, ते दररोज जवळपास तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करतात. यादरम्यान त्यांचे पूर्णतः मौनव्रत असते. मौनव्रत काळात त्यांना कोणी भेटले किंवा त्यांना काही सांगायचे झाल्यास तर ते कागदावर लिहून त्यांना सांगतात.

ते दररोज चार तास पूजा-अर्चा करतात आणि सकाळी दहा ते अकरा व सायंकाळी सहा ते सातदरम्यान जेवण करतात. दरम्यान, आमलाड येथे त्यांचे आगमन झाले त्या वेळी येथील समाजसेवक योगेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि आमलाड येथून तळोद्यापर्यंत त्यांच्यासोबत पदयात्रा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील गायत्री मिनरल वॉटर फिल्टरपर्यंत त्यांच्यासोबत पदयात्रा केली.

"याआधी वृंदावन येथील यात्रा पदयात्रेने व दंडवत-प्रणाम करीत पूर्ण केली आहे. तसेच एकदा नर्मदा परिक्रमादेखील पदयात्रेने पूर्ण केली आहे. आता दुसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी निघालो असून, ही यात्रा दंडवत-प्रणाम करीत पूर्ण करण्याचा मानस आहे." -स्वामी गिरी महाराज

दररोज तीन किलोमीटरचा प्रवास

स्वामी गिरी महाराज वाटेत रात्री एखाद्या मंदिरात मुक्काम करीत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्यांच्या परिक्रमेला सुरवात करतात. दररोज ते फक्त जवळपास तीन किलोमीटरचा प्रवास करीत असल्याने त्यांना अजून परिक्रमा पूर्ण करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र त्यांचा दृढनिश्चय, आत्मविश्वास पाहता ते आपले स्वप्न पूर्ण करतील यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Satara Rain: सातारा जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; वीजपुरवठा खंडित; पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, अनेक रस्ते बंद!

शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी! शाळा देईनात रिक्त-अतिरिक्त पदांची माहिती; दुसऱ्यांदा काढावा लागला आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला इशारा, वाचा...

शाळांचे धाबे दणाणले! परीक्षा सुरु असताना एकाचवेळी होणार सर्व शाळांमधील पटपडताळणी; शिक्षण संचालकांचे आदेश; पटसंख्येतील शाळांची बनवेगिरी उघड होणार

Crunchy Makhana Chaat: सकाळी फक्त ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत माखाना चाट; आंबट-तिखट चवीसह हेल्दी नाश्त्याचा संपूर्ण धमाका!

SCROLL FOR NEXT