Dhule Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : प्रवेशबंदीतील सानपचा धुळ्यात पोलिसावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात प्रवेश बंदी असलेल्या संशयित रोहित सानप याने पोलिस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केला. भरत कोष्टी असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २) रात्री घडली. (tadipar Rohit Sanap attack on police in Dhule Crime Latest Marathi News)

गणेशोत्सवानिमित्त पोलिस प्रशासनाने ३९ समाजकंटकांना शहरात ३१ ऑगस्ट ते १० सप्टेबरपर्यंत प्रवेशबंदी केली आहे. त्यात रोहित रविकांत सानप (रा. विघ्नहर्ता कॉलनी, देवपूर) याचा समावेश आहे. प्रवेशबंदीचा आदेश झुगारून रोहित घरी आला.

त्यामुळे देवपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी भरत कोष्टी, मिलिंद सोनवणे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार साळवे, चव्हाण आदी त्याच्या घरी गेले. त्यावेळी रोहित आक्रमक झाला. त्याने कोष्टी यांची कॉलर पकडून दमदाटी केली. नंतर कोयत्याने त्यांच्यावर वार केला. हा वार चुकविताना कोष्टी यांच्या डाव्या दंडावर दुखापत झाली. पोलिसांनी रोहितला कोयत्यासह अटक केली. त्याच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT