chandori.jpg
chandori.jpg 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : मतदान करताना ही घ्या काळजी..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आज (ता.21) मतदान होत असून त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय हददीमध्ये व जिल्ह्यात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दला, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या असा सुमारे 10 हजार 500चा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, संवेदन-अतिसंवेदनशिल भागाला तर छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सतर्कता बाळगली जात आहे. 

मोबाईल अॅपचा वापर करीत  मतदान
बीएलओ उपलब्ध नसेल त्या ठिकाणी नागरिकांनी मतदार यादीत नाव शोधून घेत तसेच मोबाईल अॅपचा वापर करीत नावे शोधून मतदान केले आहे. मतदान यंत्रे बिघाडाच्या किरकोळ तक्रारी असून नाशिक मध्य मतदार संघात द्वारका येथील अटल बिहारी वाजपेयी स्कुलमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळावे लागले. 
 

मतदारांनो काळजीपूर्वक मतदान करा

१) सोमवारी  कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना शक्यतो मोबाईल घेऊन  जाऊ नये . 

 २)Voting बुथमध्ये मोबाईल  नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नयेत.  
 
३)कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर  बसावे लागेल. 

४) कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेंकद)  बटण दाबून ठेवा.  एक बीप आवाज येईल.  

५) EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरूण बोट काढू नका.  

६) व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा.

७) शक्य तितक्या लोकांना ही माहिती द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT