VANI DEVI JYOT.jpg 
उत्तर महाराष्ट्र

आईमाऊलीची ज्योत निघाली भक्तांकडे..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास (ता. २९) पासून प्रारंभ होत आहे. कसमादे व खान्देशातील भाविक सप्तशृंगी गडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी पादत्राणे न घालता घेऊन जात आहेत. यात पाचोरा, धुळे, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मालेगाव या भागातील भाविकांचे प्रमाण अधिक आहे. 

गडावरील ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व

नवरात्रोत्सवात प्रत्येक घरी घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केले जातात. घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दोन दिवस अगोदरपासून भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या साहाय्याने गावी घेऊन जातात. गावात तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी या ज्योतीद्वारे दिवे प्रज्वलित केले जातात. उत्तर महाराष्ट्राबरोबरच कसमादेसह नाशिक जिल्ह्यातही ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या भक्तीला कुठेही अडथळा येऊ नये, म्हणून इतर भाविक ठिकठिकाणी ज्योत पोचविण्यास हातभार लावतात. पाऊस असूनही भाविक न थांबता ज्योत घेऊन गावाच्या दिशेने जात आहेत. दमला की दुसरा नंतर तिसरा अशा क्रमाने ज्योत नेली जाते. 

 दुर्गामाता मंदिरात तयारी सुरू 
येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त तयारी सुरू आहे. मंदिर परिसरात स्वच्छतेसह रोषणाई केली आहे. रोज देवीला अभिषेक, महापूजा तसेच दुर्गासप्तपदी, मंत्रपुष्पांजली, अष्टमीच्या दिवशी नवचंडीयोगसह इतरही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SCROLL FOR NEXT