उत्तर महाराष्ट्र

शिक्षकांमध्ये समाधान..डिसीपीएस धारकांचा हिशेब देण्यास सुरूवात

तुषार देवरे

देऊर: धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत 
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डीसीपीएस धारक शिक्षकांचा हिशोब मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर 'सकाळ' च्या माध्यमातून वेळोवेळी समस्या उजेडात आणून वस्तुस्थिती मांडण्यात आली. जिल्हा प्रशासनाने बातम्यांची दखल घेत 
जिल्ह्यातील डीसीपीएस धारक शिक्षकांचा हिशेब देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे डीसीपीएस धारक शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात डीसीपीएस धारक शिक्षकांना हिशेब पावत्या नुकत्याच वाटप करण्यात आल्या. दरम्यान प्रतिनिधिक स्वरूपात संघटनेचे तथा डीसीपीएस धारकांना तर्फे ज्ञानेश्वर बाविस्कर, अतुल पाटील, सुवर्णा देसले यांनी पावत्या स्वीकारल्या. आतापर्यंत पाचशेवर डीसीपीएस धारक शिक्षकांचा हिशेब गटशिक्षणाधिकारींच्या स्वाक्षरीसाठी पावत्या देण्यात आल्या. त्या केंद्रनिहाय शिक्षकांना देण्यात येतील. 


राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे तालुका, जिल्हा स्तरावर निवेदन देऊन पाठपुरावा सुरू होता. संघटनेला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी आश्वासन दिले होते. अध्यक्षांच्या सूचनान्वये मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.गांगुर्डे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू होते. वित्त विभाग,आस्थापना लिपिक, जिल्हा व तालुकास्तर तंत्रस्नेही शिक्षकांनी कामास वेग दिला. लवकरच धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुकास्तरावर हिशेब पावत्या वाटप करण्यात येणार आहेत. दोन दिवसापासून तालुकास्तरावर डीसीपीएस धारक शिक्षकांना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (एनपीएस) योजनेत समावेशाचे अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. अन्यथा त्या शिक्षकांचे वेतन थांबविले जाणार आहे.


पेसा क्षेत्रांतून बदलीने आलेल्या शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम एकस्तर वेतनश्रेणी नुसार कपात करून उर्वरित रक्कम व विकल्प नुसारच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करावी. गेल्या पाच वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांच्या डीसीपीएस कपात हप्त्यांचा हिशोब मिळावा. यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटना प्रयत्नशील आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.गांगुर्डे, जुनी पेंशन संघटेनेचे शशांक रंधे, ज्ञानेश्वर बाविस्कर, रवी बोरसे, अतुल पाटील, अनिस शहा आदि उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satellite Toll System : नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा झटका, सॅटेलाईट टोल टॅक्स कलेक्शन प्रोजेक्ट स्थगित; नेमकं कारण काय?

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

Property Law: आई असेपर्यंत आजोबांच्या मिळकतीत हिस्सा नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

Latest Marathi News Live Update : रायगडच्या महाडमध्ये दोन पक्षातील समर्थकांमध्ये तुफान राडा

लेकाच्या संगीत सोहळ्याला आदेश भाऊजींचा त्यांच्या होममिनिस्टरबरोबर धमाल डान्स

SCROLL FOR NEXT