उत्तर महाराष्ट्र

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन स्थगित !

तुषार देवरे

देऊर : राज्यातील स्थानिक स्वराज्य व खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत (पहिली ते आठवी) १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना ३० मार्च २०१९ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही शिक्षकांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र संबंधित संस्थांकडे व शिक्षण विभागाकडे दिलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांचे वेतन १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

जे शिक्षक वेतन घेत असतील त्यांचे वेतन तत्काळ स्थगित करण्यात यावे. या शिक्षकांच्या सेवा तत्काळ प्रभावाने समाप्तीची आवश्यक कार्यवाही करावी. असे पत्र नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी व महापालिका, पालिका, प्रशासनाधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे. 

हमीपत्र सादर करण्याचे बंधन
शासनाच्या निर्देशांनुसार टीईटी पात्र नसताना किती शिक्षकांच्या नेमणुका संस्थेने केल्या. विहित कालावधीत स्वतः शिक्षकांनी पदवी धारण का केली नाही हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मुख्याध्यापकांना शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहे अथवा नाही, याचे हमीपत्रच सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. केंद्र सरकारने बालकांचा मोफत सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पासून पारित केला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई)ने पहिली ते आठवीसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्‍चित केली. त्यानुसार टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, त्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदत होती. मात्र, काही शिक्षकांना या मुदतीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळविता आले नाही. नाशिक उपसंचालक कार्यालयाकडून आठवडाभरात जिल्हानिहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे. अपात्र शिक्षकांना नोटिसा, खुलासा मागविणे, त्यांच्याकडून काय उत्तर येते, यासाठी मार्चअखेरीस हा निर्णय होणार आहे. 




टीईटी उत्तीर्ण पात्रताधारकांच्या तक्रारी या कार्यालयाला मिळाल्या आहेत. ‘आम्ही पात्र असून, आम्हाला नोकरी नाही. आमच्या जागा दुसऱ्यांनी बळकाविल्या’, अशी त्यांची तक्रार आहे. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. मार्चअखेर निर्णय होऊन प्रक्रिया पूर्ण होणार. अपात्र शिक्षक राहू नयेत हा यामागचा उद्देश आहे. 
-नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

 

संपादन-  भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT