उत्तर महाराष्ट्र

अटी-शर्तींची पूर्ततेवर शिक्षक बदल्यांना अखेर मान्यता 

रमाकांत घोडराज

धुळे  : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या अन्य नागरी/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत बदली/सेवा वर्ग करण्यास शासनाने अटी-शर्तींवर मान्यता दिली आहे. धुळे महापालिका शाळांचा विचार करता धुळे महापालिका शाळांमधून इतरत्र जाणारे सहा-सात, तर इतर ठिकाणांहून धुळे महापालिका शाळांत येणारे असे दहा-बारा शिक्षक रांगेत आहेत. 

कौटुंबिक तसेच इतर विविध कारणास्तव बदली/सेवा वर्ग करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर संबंधित शिक्षकांकडून सतत मागणी होत होती. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आमदार/खासदार यांच्याकडूनही शासनाकडे शिफारशी तसेच पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने महापालिका/पालिका/नगरपंचायती यांच्याकडील शिक्षकांच्या सेवा कायमस्वरूपी वर्ग करण्यास अटी-शर्तीवर मान्यता दिली आहे. सेवा वर्ग करण्याबाबत मान्यतेचे अधिकार संबंधित महापालिका आयुक्त, पालिका-परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. 

अटी-शर्ती अशा 
ज्या महापालिका/पालिका/नगरपंचायती अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांनी सेवा वर्ग करण्याची मागणी केली असेल अशा सेवा वर्ग करण्यासाठी संबंधित दोन्ही नियुक्‍ती प्राधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्‍यक राहील. नियुक्‍ती मागितलेल्या ठिकाणी लागू असलेल्या सेवाविषयक आणि वेतनाविषयी तरतुदी संबंधित शिक्षकांना स्वीकारणे बंधनकारक राहील, मूळ नियुक्तीच्या ठिकाणी असलेली सेवाज्येष्ठता बदलीच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी गमवावी लागेल यास संबंधित शिक्षकांची पूर्वसंमती आवश्‍यक राहील. नवीन ठिकाणी त्यांची ज्येष्ठता कनिष्ठ राहील, सेवा वर्ग करण्याची बदलीची मागणी करणाऱ्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांची नियुक्‍ती नियमित पदावर झालेली असावी. तसेच परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला असावा. संबंधित शिक्षकाविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी सुरू नसावी अथवा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत. एकाच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून एकापेक्षा जास्त शिक्षकांचे अर्ज असतील तर ज्या नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नियुक्ती मागितली आहे तेथे एकच पद रिक्‍त असल्यास सेवाज्येष्ठता विचारात घ्यावी. तथापि, महिला शिक्षकांबाबत प्राधान्य राहील. शिक्षणसेवकांना बदली प्रक्रिया लागू नसेल. तथापि, अपवादात्मक प्रकरणी पूर्वमान्यतेने अशी बदली करता येईल. यामध्येही महिला शिक्षणसेवकांस प्राधान्य राहील. एकाच जिल्ह्यातील नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेवा वर्ग करता येणार नाही. सेवा वर्ग करण्याची मागणी करणाऱ्या शिक्षकांची निवड ज्या प्रवर्गातून झाली असेल त्या प्रवर्गातील पद संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रिक्त असणे आवश्‍यक राहील. 

धुळे महापालिकेतील स्थिती 
धुळे महापालिकेच्या शहरात एकूण २० शाळा (ऊर्दू माध्यम-१२, मराठी-माध्यम- ८) सुरू आहेत. यातील प्रामुख्याने ऊर्दू माध्यमाच्या शाळांतील पाच-सहा शिक्षकांना बदली हवी आहे. असा विषय नुकताच महासभेपुढेही आला होता. याशिवाय इतर ठिकाणांहून धुळ्यात येण्यास इच्छुक असलेले दहा-बारा शिक्षक असल्याची माहिती मिळाली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT