हतगड दरीत कोसळलेली नवसारीच्या भाविकांची बस.
हतगड दरीत कोसळलेली नवसारीच्या भाविकांची बस. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दहा ठार

सकाळवृत्तसेवा

नाशिक - जिल्ह्यात बुधवारी (ता. २)  झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल दहा जण ठार झाले. जिल्ह्यासाठी बुधवारी हा घातवार ठरला.

दोघे चुलतभाऊ अपघातात ठार
मालेगाव - बहिणीच्या लग्नाच्या अक्षता देण्यासाठी नातेवाइकांकडे जात असताना महामार्गावरील देवारपाडे शिवारात दुचाकीला (एमएच ४१-२७९२) कंटेनरने दिलेल्या धडकेत दोघे चुलतभाऊ जागीच ठार झाले.

दुचाकीवरून लक्ष्मण छोटू साळुंके (वय ३०) व गणेश संजय साळुंके (२८) हे सायतरपाडे येथील दोघे चुलतभाऊ दिवसभर विविध गावांना भेटी देत नातेवाइकांना विवाहाचे निमंत्रण देत होते. बुधवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास देवारपाडे शिवारात कंटेनरची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मणच्या बहिणीचा ९ मेस विवाह आहे. तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

भाविकांच्या बसला अपघात; चार ठार
बोरगाव/ सुरगाणा - हतगड- कनाशी राज्य महामार्गावरील हतगडजवळील गायदर घाटात ५६ भाविकांना देवीदर्शनासाठी घेऊन येणारी लक्‍झरी बस दरीत कोसळून चार ठार, तर पंचवीस जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. २) पहाटे तीनला घडली.

नवसारी (गुजराथ) येथून हील ट्रॅव्हलची बस (जीजे ५, एझेड ४८५०) ५६ भाविकांना घेऊन सप्तशृंगगडाकडे येत असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास गायदरी घाटाच्या धोकादायक वळणावर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने बस तीस फूट दरीत कोसळली. यात पलकूनबेन दीपकभाई हालुपती (वय ३०) व गीताबेन संजय तलविया (वय ४०), जयनिल मुकेश पटेल (वय ४) हे तिघे जागीच ठार झाले, तर बसच्या केबिनमध्ये दोन्ही पाय अडकलेल्या तन्मय पंकज पटेल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अपघातातील जखमींमध्ये निरूबेन पवन पटेल (वय ६०), विशाखा अनिल पटेल (वय १२), जयेश ओम पटेल (वय १२), नरेश रामा पटेल (वय ४२), दमयंती पटेल (वय ४९), चंद्रकांत भय्या (वय ४६), मयूरी पटेल (वय २६), शमीबेन पटेल (वय ६०), लक्ष्मी गोपाल पटेल (वय ६०), प्रतिभा दिनेश, शामा भय्या (वय ४८), प्रियंका पटेल (वय ३५), जितेंद्र मन्साराम पटेल (वय ४६), पंकजेरावर पटेल (वय ३५), ज्योती चिन्मय पटेल (वय ३५), बेनूबेन पटेल (वय ४९, सर्व रा. नवसारी, गुजरात), चालक जयमीन शकर पटेल यांचा समावेश आहे. या जखमींवर बोरगाव (ता. सुरगाणा) प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. गवळी, डॉ. खंडू भोये, डॉ. दिलीप जाधव यांनी उपचार केले. काहींना सापुतारा व नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. 

घटनेची माहिती समजताच गुजरात राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आर. सी. पटेल, उपजिल्हाधिकारी बी. एम. आवारे, तुकाराम कर्डिले, कळवणचे उपविभागीय अधिकारी अमित मित्तल यांनी घटनास्थळी जाऊन जखमींची पाहणी केली.

गणेश कराडचा अपघाती मृत्यू
मनमाड - येथील तरुणाचा मंगळवारी (ता. १) धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.  मनमाड पालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व बुधलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कराड यांचे पुत्र गणेश कराड यांचा धावत्या रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला. मनमाड-मुंबई रेल्वेमार्गावर आश्‍विननगरजवळील खांब क्रमांक २५८ च्या १६-१७ दरम्यान हा अपघात घडला. त्यांच्या मागे आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

वऱ्हाणे शिवारात अपघातात शिक्षकाचा मृत्यू
मालेगाव - मालेगाव- मनमाड रस्त्यावरील वऱ्हाणे शिवारात क्रूझरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिक्षक वसंत कागडा पाडवी (रा. मुंदलवड, ता. धडगाव, जि. नंदुरबार) ठार झाले. श्री. पाडवी सोलापूर जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेला सुटी लागल्याने ते दुचाकीवरून गावी जात होते. सकाळी अकराच्या सुमारास क्रूझरची धडक दुचाकीस बसली. बेशुद्धावस्थेत त्यांना येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने दुपारी दोनला त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे नातेवाईक पोचले नव्हते. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी व्हॉट्‌सॲपवरून आवाहन केल्यानंतर पाडवी यांच्या मदतीसाठी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी रुग्णालयात पोचले. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

नाशिक रोड भागात दोन जण ठार 
नाशिक रोड - परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जण ठार झाले. रस्त्याने जात असताना अंबादास म्हसके (वय ९०, रा. सिद्धार्थनगर, एकलहरे गेट) यांना दुचाकीने (एमएच १५, डीएल ४१२३) धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीचालक मुस्ताक रमजान शेख याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत गोपीनाथ राजपूत (वय ४७, रा. आरिंगळे मळा) हिंगणवेढे येथे घराला रंग देत होते. त्यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT