उत्तर महाराष्ट्र

मेटॅडोर उलटून दोन ठार 

सकाळन्यूजनेटवर्क

मेटॅडोर उलटून दोन ठार 

फैजपूर/न्हावी/ सावदा (ता. रावेर) : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मेटॅडोरला आज सकाळी भीषण अपघात होऊन त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जण जागीच ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी आहेत. 

प्राप्त माहितीनुसार पालच्या आठवडे बाजारासाठी आज सकाळी साडेदहाला भाजीपाला, आंबे आदी माल विक्रीसाठी फैजपूरचे व्यावसायिक मेटॅडोरने (क्रमांक एमएच 15 जी 7370) खिरोदामार्गे जात होते. पालजवळील बोरघाटात अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कठड्यावर आदळला व तीन चार वेळा उलटला. यात फैजपूरच्या न्हावी दरवाजा भागातील कापड विक्रेते मोतीलाल पंडित गुरव (वय 52, रा. फैजपूर) व शेख अरबाज शेख सादिक (वय 18 रा. हजिरा मोहल्ला, फैजपूर) हे दोघे जागीच ठार झाले. मृत व्यक्ती हे घरातील कमावते असल्याने फैजपूरमध्ये हळहळ व्यक्‍त होत आहे. 

अपघातात कैलास सोनार, दानीश खान असलम खान, एजाजखान अश्रफखान, आसिफखान असलमखान, फिरोज इस्माईल तडवी, शकील इस्माईल तडवी, मोहंमद साद असलमखान (सर्व रा. फैजपूर) हे जखमी झाले. जखमींना खिरोदा व फैजपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात घडल्यावर पाल घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. सावदा पोलिस व नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. याबाबत सावदा पोलिसात नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे. 

मोठा अनर्थ टळला 
पाल घाटात उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने मेटॅडोर उलटला आणि रस्त्याच्या कडेला पत्राच्या संरक्षण कठड्यावर जाऊन अडकला. बाजूला खोल दरी असल्यामुळे कठडा तोडून मेटॅडोर खाली कोसळला असता, तर मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा अपघातस्थळी होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT