dhule sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : माझ्याकडून सुकन्या योजनेचा पहिला हप्ता

खासदार सी. आर. पाटील यांची बोरीसच्या लेकींना अनोखी भेट; मान्यवरांकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : समाज व्यवस्था टिकविण्यासाठी मुलीचा जन्म होवू द्या. कन्या रत्नाचा आदर करा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. प्रत्येक पालकाने या योजनेत सहभागी व्हावे. त्यासाठी वर्षाकाठी ठरावीक रक्कम भरा. बोरीसमधील सर्व लेकींना या योजनेत सहभागी करा. त्यांच्या कल्याणासाठी योजनेचा पहिला हप्ता मी भरतो, असे सांगत गुजरातमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी. आर. पाटील यांनी रविवारी सर्वत्र साजरा होणाऱ्या जागतिक कन्या दिनानिमित्त ही बहुमोल भेट दिली.

बोरीस (ता. धुळे) येथे खासदार पाटील यांचा खानदेशचे सुपुत्र म्हणून सन्मान झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे व्याही तथा भाजपचे नेते सुभाष देवरे, माजी पर्यटनमंत्री तथा आमदार जयकुमार रावल, महापौर प्रदीप कर्पे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, सुधीर जाधव, माजी कृषी सभापती बापू खलाणे, खासदार पाटील यांची कन्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती धरती निखिल देवरे, उद्योजक निखिल सुभाष देवरे, विलास देवरे, नगरसेवक हिरामण गवळी, मंगला पाटील, सुरेश पाटील, देवेंद्र पाटील, विरेंद्रसिंह गिरासे, प्रा. अरविंद जाधव, राम भदाणे, आशुतोष पाटील, संग्राम पाटील, धनंजय मंगळे, तुषार महाले, रावसाहेब गिरासे आदी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, की आज जागतिक कन्यादिन आहे. सर्वांनी लेकींचा आदर करण्याचा, भ्रूण हत्येला मुठमाती देण्याचा संकल्प करावा. कुटुंबात स्वर्गीय सुख हवे असेल, तर एक मुलगी असायलाच हवी. हुंडा मागणाऱ्याला मुली देऊच नये. अशांच्या विवाह सोहळ्यातही जाऊ नये. धरती देवरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत मनोगत व्यक्त केले. आमदार रावल म्हणाले, की भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार पाटील यांचा जन्म खानदेशातील आहे. त्यांना कर्तबगारीमुळे सर्वांत मोठी पदे गुजरातमध्ये मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT