In the bus station area, Bapu Chavan's bike repair shop has a clean cupboard ाेोकोत
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : म्हसदीतील 2 दुकानांमध्ये चोरी; लाखोचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी (जि. धुळे) : येथे व परिसरात गेल्या आठवड्यापासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोन दिवसांपासून ठिबक (इरिगेशन) साहित्य आणि दुचाकी दुरुस्ती दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले. शिवाय काकोर, पाडगण शिवारात तब्बल एकोणीस वीज पंपाची धाडसी चोरी चोरट्यांनी केली आहे. ( Theft in 2 shops in Mhasadi of lakhs Dhule Crime Latest Marathi News)

येथील बसस्थानक परिसरात बापू देविदास चव्हाण यांचे सायकल, दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. सोमवारी (ता.१२) रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडत दुचाकीचे ट्यूब, रीमोल्ड टायर, सायकल, दुचाकी दुरुस्तीचे तत्सम साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. मंगळवारी (ता.१३) सकाळी श्री.चव्हाण दुकानावर गेल्यावर हा प्रकार लक्षात आला.

शिवाय रविवारी (ता.११) म्हसदी - वसमार रस्त्यावरील आनंद इरिगेशन व हार्डवेअरच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला. दुकानातून पाच अश्व शक्तीचे चार, तीन अश्व शक्तीचे दोन वीज पंप, सर्व्हिस वायर बंडल,चार स्प्रे पंप असा सुमारे दीड लाखाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Pune: तरुणीला पाहत भररस्त्यात हस्थमैथून, तरुणाचं अश्लील कृत्य कॅमेरात कैद; संतापजनक प्रकाराने पुण्यात खळबळ

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी सीबीआय न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT